Just another WordPress site

प्रेमासाठी तीने उचलले होते मोठे पाऊल पण….

लक्ष्मी धनेषच्या प्रेम कहाणीचा दोन लहानग्यांना चटका

सांगली दि १८(प्रतिनिधी) –  सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील सिंदूर गावात आपल्या दोन मुलासह स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. तिच्या नऊ महिन्याच्या मुलाचा मृतदेह विहिरीत तरंगताना दिसल्यानंतर हा प्रकार समोर आला. आत्महत्येचे कारण अस्षष्ट आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.

GIF Advt

लक्ष्मी धनेश माडग्याळ, दिव्या धनेश माडग्याळ, आणि नऊ महिन्याचा मुलगा श्रीशैल अशा तिघांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जत तालुक्यातील सिंदूर येथील लक्ष्मीचा एका तरुणाबरोबर विवाह ठरला होता.मात्र तिने गावातीलच धनेश सिद्दनिंग माडग्याळबरोबर पळून जाऊन लग्न केले होते. त्यावेळी जत पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल होती पण तिलस अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर ते परत गावी येऊन धनेषबरोबर शेतात राहत होती. पळून जाताना करण्यात आलेली तक्रार माघारी घेण्यासाठी मुलीच्या आई-वडिलांना धनेशने काही रक्कम दिली होती. त्यामुळे पती पत्नीत सतत वाद होत होता. घटनेच्या दिवशीही त्यांच्यात वाद झाल्याने तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असण्याची शक्यता आहे.

तिघांचे मृतदेह सांगोल्याच्या पथकाला बोलावून बाहेर काढण्यात आले. ग्रामस्थांनी रविवारी रात्री उशिरा मृतदेह बाहेर काढून जत ग्रामीण रुग्णालयात आणला. जत पोलीस ठाण्यात  मयत अशी नोंद झाली असून अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. या घटनेमुळे सिंदूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!