उत्तर प्रदेश दि ३(प्रतिनिधी) – उत्तर प्रदेशातील हमीरपूरमध्ये एका जोडप्याच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. पण यावेळी पतीला पत्नीबरोबर पत्नीच्या मैत्रीणींने पतीला चपलेने मारहाण केली आहे. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत हमीरपूर पोलिस दोघींचा शोध सुरु केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हमीरपूर येथील पती पत्नीमध्ये काैटुंबिक वाद सुरु आहे.त्यामुळे कोर्टात देखील केस सुरु आहे. त्याच्याच सुनावणीसाठी पती आणि पत्नी हमीरपूरमध्ये आले होते. कोर्टात सुनावणी झाल्यानंतर पती गावी जाण्यासाठी बस स्टँडवर आला होता. यावेळी त्याची पत्नीही तिच्या मैत्रिणीसोबत आली. यादरम्यान, दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि पत्नीच्या मैत्रिणीने थेट पायातील चप्पल काढून पतीला मारहाण केली. त्यानंतर पत्नीनेही पतीला चपलेने मारहाण केली. यानंतर दोन्ही महिला पतीला शिवीगाळ करत तेथून निघून गेल्या. विशेष म्हणजे या दोन महिला व्यक्तीला मारहाण करत असताना घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. मात्र, त्यापैकी कोणीही या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला नाही.

दोघा पती पत्नीमध्ये वाद झाल्याने पत्नीने पतीविरोधात न्यायालयात हुंडा आणि छळाचे प्रकरण दाखल केले आहे. मात्र, त्यांच्या खटल्याला पुढील तारीख मिळाली. दोघेही आपापल्या घरी जाण्यासाठी कोर्टातून निघाले होते. पण सध्या दोघांच्या वादाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.