दिल्ली दि ३(प्रतिनिधी)- देशातील बहुचर्चीत गुजरात विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक आज अखेर जाहीर झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. गुजरातमध्ये दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. यावेळी सत्ताधारी भाजपाला काँग्रेसबरोबर आपचे आव्हान असणार आहे.
गुजरात विधानसभेची १८२ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभेसाठी दोन टप्प्यात निवडणूक जाहीर केली आहे.
गुजरात विधानसभा निवडणूक वेळापत्रक
पहिल्या टप्प्याची अधिसूचना ५ नोव्हेंबर २०२२
दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना १० नोव्हेंबर २०२२
पहिल्या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्याचा दिवस १४ नोव्हेंबर २०२२
पहिल्या टप्प्यातील अर्जांची छाननी १५ नोव्हेंबर २०२२
अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस १७ नोव्हेंबर २०२२

दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्याचा दिवस १७ नोव्हेंबर २०२२
दुसऱ्या टप्प्यातील अर्जांची छाननी १८ नोव्हेंबर २०२२
अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस २१ नोव्हेंबर २०२२
पहिल्या टप्प्याचे मतदान १ डिसेंबर २०२२
दुसऱ्या टप्प्याचे मतदान ५ डिसेंबर २०२२
मतमोजणी ८ डिसेंबर २०२२
गुजरातमध्ये २०१७मध्ये भाजपने गुजरात विधानसभा निवडणुकीत ९९ जागांवर विजय मिळवला होता. तर, काँग्रेसला ७७ जागांवर समाधान मानावे लागले होते. तर, दोन जागांवर बीटीपी (भारतीय ट्रायबल पार्टी) आणि एका जागेवर एनसीपीच्या उमेदवारांचा विजय झाला होता. तर, तीन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले होते.