Latest Marathi News

कोयता गँगने जिथे कोयते नाचवले तिथेच पोलीसांनी काढली धिंड

कोयता गँगची मस्ती पुणे पोलीसांनी जिरवली, धिंडीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल

पुणे दि २(प्रतिनिधी)- पुण्यात कोयता गँगची दहशत वाढल्यामुळे नागरिकांनी पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्याचबरोबर विधानसभेतही हा मुद्दा चर्चेत आला होता. त्यानंतर पोलीसांनी वेगाने कारवाई करत दहशत माजवणा-या कोयता गँगच्या मुसक्या आवळल्या आहेत एवढेच नाहीतर त्यांची धिंड काढत चांगलीच जिरवली आहे.

पुण्यातील आंबेगाव येथील सिंहगड विधी महाविद्यालय परिसरात कोयता घेऊन दोघांनी दहशत निर्माण केल्याची घटना २८ डिसेंबरला घडली होती. कोयता गँगच्या आरोपींनी वाहनांबरोबरच दिसेल त्या व्यक्तींवर आणि दुकानांवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांची तिथेच धुलाई करण्यात आली होती. पण काही आरोपी फरार झाले होते. पण पोलीसांनी त्यांना बेड्या ठोकत त्यांनी ज्या ठिकाणी दहशत माजवली होती त्या ठिकाणीच आरोपींची पोलिसांकडून वरात काढण्यात आली आहे. दरम्यान पोलीसांनी एका आरोपीला चोप देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावेळी एक आरोपी करण दळवी हा फरार होता. त्यानंतर करण दळवीला घेऊन भारती विद्यापीठ पोलीस सिंहगड कॉलेज परिसरात असे गुन्हा होऊ नये म्हणून वरात काढत कोयता गँगची मस्ती जिरवली आहे. या धिंडचा व्हिडिओही सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आंबेगाव परिसरातील विधी महाविद्यालयासमोरील खाऊ गल्लीत रात्री दहाच्या सुमारास करण आणि त्याचा अल्पवयीन साथीदार कोयते फिरवत आले. त्यांनी सुरवातीला रस्त्त्यावर पार्क केलेल्या दुचाकींवर कोयत्याने वार केले. यानंतर येथील एका हॉटेलमध्ये घुसून एका ग्राहकावर कोयत्याने हल्ला केला होता. यावेळी सुजित गायकवाड पोलीसांच्या हाती लागला होता तर करण फरार होता आज त्याचीही वरात काढत चांगलीच जिरवली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!