Latest Marathi News
Ganesh J GIF

“जामनेर हादरलं! फटाका कारखान्याला भीषण आग; स्फोटांच्या आवाजाने परिसर हादरला, धुराचे लोट किलोमीटरवर!”

पाळधी ता. जामनेरनजीक असलेल्या एका फटाका कारखान्यात सोमवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली यात गोडाऊनमध्ये असलेले लाखो रुपयांचे फटाके जळून खाक झाले.

सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.

पाळधीनजीक भवानी फाट्या जवळ राजकोटवाला फटका कारखाना आहे. सोमवारी सकाळी आग लागल्याचे सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आले. वाऱ्यामुळे आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. आग आटोक्यात आणण्यासाठी जामनेर, शेंदुर्णी आणि जळगाव येथून पाच ते सहा अग्निशमन बंब मागवण्यात आले होते. सकाळी दहा वाजेच्या दरम्यान ही आग आटोक्यात आली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!