Latest Marathi News

अभिनेत्री वैशाली ठक्करच्या आत्महत्येस जवळचाच व्यक्ती कारणीभूत

पोलीसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या, आरोपीचा व्हिडीओ पाहून चकित व्हाल

इंदूर दि २०(प्रतिनिधी)- ‘ससुराल सिमर का’ आणि ‘ये रिश्ता क्या केहेलाता है’ फेम अभिनेत्री वैशाली ठक्करने गळफास घेत आत्महत्या केली होती. यावेळी तिच्या जवळ आढळलेल्या सुसाईट नोटने तिने त्रासला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले होते. सुसाईड नोट आणि डायरीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला आहे. यात त्यांना मोठे यश मिळालं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील मुख्य आरोपी वैशाली ठक्करचा एक्स बॉयफ्रेंड राहुल नवलानी याला इंदूर पोलिसांनी अटक केली आहे. तसेच तो पोलीस स्टेशनमध्ये उभा असल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. वैशालीचे लग्न जमले होते त्यामुळे ती इंदुरला आली होती. पण तिचा एक्स बॉयफ्रेंड राहुल नवलानी तिला सतत ब्लॅकमेल करत होता. त्यामुळे १६ आॅक्टोबरला वैशालीने इंदूरमधील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना राहुल दुसऱ्या देशात पळून जाऊ शकतो अशी भीती होती. म्हणून पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केलं होती त्याचबरोबर त्याच्यावर बक्षिस सुद्धा जाहीर करण्यात आले होते.

वैशाली ठक्करने २०१५ मध्ये ‘ये रिश्ता क्या केहेलाता है’ या लोकप्रिय मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या मालिकेत तिने संजना ही भूमिका साकारली होती. त्यामुळे तिला प्रसिद्धीही मिळाली होती.पण जुन्या प्रियकरामुळे तिने आपली जिवनयात्रा संपवली. अखेर आरोपी अटकेत आला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!