Latest Marathi News
Ganesh J GIF

सुप्रिया सुळे बारामतीतून निवडणूक लढणार नाहीत

राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पवार कुटुंबाशी संबंधित ही बातमी आहे. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यापुढे बारामतीतून लढणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मी दुसऱ्या मतदारसंघातून लढेन. पण बारामतीत कुटुंबाच्या विरोधात नकोच, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. तर दुसरीकडे विरोधकांनीही त्यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळे यांचं नेमकं विधान काय?

सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन मनातील भावना बोलून दाखवल्या होत्या. मी यापुढे पवार कुटुंबीयांच्या विरोधात कधीही निवडणूक लढणार नाही. मागच्यावेळीही माझी बारामतीतून लढण्याची इच्छा नव्हती. पण त्यावेळी कारणं वेगळी होती. आता मात्र, मी कुटुंबातील कोणत्याही सदस्याविरोधात लढणार नाही. मी दुसरा मतदारसंघ बघणार आहे. कुटुंबातील दुसऱ्या कुणाला बारामतीतून लढायचं असेल तर त्यांनी लढावं, मी मात्र, लढणार नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

तसेच पवार कुटुंबीय कालही एक होतं. आजही एक आहे. त्यामुळे 2029मध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढाई होणार नाही, याची आम्ही काळजी घेणार आहोत, असं सांगत सुप्रिया सुळे यांनी 2029मध्ये पवार विरुद्ध पवार अशी कोणतीही लढत होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!