Just another WordPress site

‘ती चाळीस गावेच नाही तर सोलापूर अक्कलकोटही कर्नाटकात घेऊ’

कर्नाटक मुख्यमंत्र्यांचे फडणवीसांना आव्हान, सीमेवरुन भाजपातच वाद

सांगली दि २४(प्रतिनिधी)- सांगली जिल्ह्यातील ४० गावे कर्नाटकात घेणार अशी घोषणाबाजी करत महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न तापवणारे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता थेट देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान दिले आहे. त्यामुळे भाजपाच्या दोन राज्यातील नेत्यांमध्येच मोठा वाद रंगला आहे. भाजपाच्या कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत फडणवीसांना चॅलेंज दिले आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “कर्नाटकच्या सीमाभागातील कोणतीही जागा देण्याचा प्रश्नच येत नाही. याउलट महाराष्ट्रातील सोलापूर आणि अक्कलकोटसारखे कन्नडभाषिक भाग आमच्या समाविष्ट केले पाहिजेत.२००४ पासून महाराष्ट्र सरकारने सीमाभागातील वादाप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. आतापर्यंत त्यांना यश आलेलं नाही आणि मिळणारही नाही. आम्ही कायदेशीर लढ्यासाठी तयार आहोत,” असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेच्या मुद्द्यावर चिथावणीखोर विधान केलं असून, त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. देशाची जमीन, पाणी आणि सीमांचं रक्षण करण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे, असे म्हणत फडणवीसांना आव्हान दिले आहे. त्यामुळे भाजपामधील दोन नेत्यांचा हा सामना आणखी रंगणात की केंद्रीय नेतृत्व यात लक्ष चालणार यांचे उत्तर आगामी घडामोडीतून स्पष्ट होणार आहे.

GIF Advt

जत तालुक्यातील काही गावांच्या ग्रामपंचायतींनी कर्नाटकमध्ये सामील होण्याचा ठराव केल्याचा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. बोमय्या यांनी मंगळवारी केला होता. मात्र, राज्य सरकारने तो फेटाळून लावला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्याचबरोबर बेळगाव-कारवार-निपाणीसह आमची गावे मिळविण्याचा प्रयत्न करणार आहोत असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!