Latest Marathi News
Ganesh J GIF

या अभिनेत्रीने चार वर्ष लहान प्रियकरासोबत केले लग्न

या राजकीय नेत्यासोबत थाटणार संसार, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्युज

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- आपल्या अभिनयापेक्षा आपल्या वादग्रस्त विधाने आणि नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने गुपचूप लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. तिने आपली विवाह देखील राजकीय व्यक्तीसोबत केले आहे.

स्वराने तिच्यापेक्षा चार वर्षांनी लहान असलेला राजकीय कार्यकर्ता आणि सपा नेता फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेज केले आहे.फहद अहमद हा समाजवादी पार्टी युवजन सभेचा स्टेट प्रेसिडेंट म्हणून काम पाहतो. या दोघांची एका आंदोलनात भेट झाली होती. विशेष म्हणजे, स्वरा आणि अहमदचे लग्न ६ जानेवारीला झाले आणि इतक्या दिवसांनंतर त्यांनी लग्नाचा खुलासा केला आहे. आज स्वराने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिच्या हातावर मेहंदी दिसत आहे. यासोबतच तिने एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने आपली लव्हस्टोरी सांगितली आहे.नेपोटिझम, राजकीय वक्तव्य त्याचसोबत जेएनयूवरील वाद या सगळ्यांमध्ये अभिनेत्री स्वरा भास्कर कायम चर्चेत असते. यामुळे तिच्यावर अनेकदा टिका देखील झाली आहे. सध्या स्वरावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.

विशेष म्हणजे स्वरा भास्कर आणि लेखक हिमांशू शर्मा डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, २०१९ मध्ये या दोघांच्या ब्रेकअपची चर्चाही समोर आली होती. अभिनेत्री शेवटची ‘जहां चार यार’ चित्रपटात दिसली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!