Just another WordPress site

उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख पदाची मुदत ‘या’ तारखेला संपणार

शिंदे गट ठाकरेंवर पद मिळवणार की, ठाकरे पद राखणार 'या' दिवशी फैसला

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणूक आयोगासमोर ठाकरे आणि शिंदे गटाकडून पक्षाचे चिन्ह धनुष्यबाणाची कायदेशीर लढाई सुरू असताना दुसरीकडे या पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचा पदाचा कार्यकाळ संपत आला आहे. ठाकरेंच्या प्रमुख पदाची मुदत २३ जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे ठाकरे गट अडचणीत आहे.

GIF Advt

शिवसेनेतील बंडखोरीनंतर पक्ष कोणाचा असा वाद निर्माण झाला. मात्र, हा वाद निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात असतानाच ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुखपदाचा कार्यकाळ २३ जानेवारीला संपणार आहे. २०१८ मध्ये उद्धव ठाकरेंची दुसऱ्यांचा पक्षप्रमुखपदी निवड झाली होती. आता २३ जानेवारीला त्याला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे आता पुढे काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई म्हणाले की, “आमच्या वकिलांनी उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुखपदाचा कार्यकाळ संपण्याआधी पक्षांतर्गत निवडणुका घेऊ देण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. अन्यथा निवडणूक होईपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत वाढवावी,” अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आल्याचे देसाई यांनी सांगितले आहे.शिंदे गटाने युक्तिवादावेळी उद्धव ठाकरेंचे शिवसेना पक्षप्रमुख पद घटनाबाह्य असल्याचे सांगितले होते.

शिंदे गटाचा दावा खोडण्यासाठी ठाकरे गट २०१८ साली झालेली शिवसेनेतील संघटनात्मक निवडीची निवडणूक ही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमानुसारच झाली आहे असा दावा करणार आहे.यावेळी पुरावा म्हणून निवडणूक आयोगानं त्यावेळी शिक्कामोर्तब केलेली प्रत पुरावा म्हणून सादर करणार आहे. त्यामुळे १७ तारीख दोन्ही गटासाठी महत्त्वाची आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!