Latest Marathi News

बंद ट्रॅक्टर अचानक सुरू होऊन दुकानात शिरला आणि..

ट्रॅक्टरच्या कारनाम्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद, अजब प्रकाराची गजब चर्चा

बिजनोर दि २(प्रतिनिधी)- उत्तर प्रदेशमधील बिजनौर भागात एक अजब घटना घडली आहे. युपीतील एका चप्पल दुकानाबाहेर उभा असलेला ट्रॅक्टर अचानकपणे सुरु झाला अन् काही सेकंदात दुकानाच्या काचा फोडून थेट दुकानात घुसला. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

नुकसान करणारा ट्रॅक्टर किशन कुमार नावाच्या व्यक्तीचा आहे. तो आपला ट्रॅक्टर शोरुम बाहेर उभा करून बाहेर गेला होता. पण काही वेळाने ट्रॅक्टर सुरु झाला आणि थेट शोरूममध्ये गेला. ट्रॅक्टर समोर उभ्या असलेल्या सायकल आणि दुचाकीला उडवत शोरूमच्या काचेच्या गेटमधून आत घुसला. ही संपूर्ण घटना शोरूममधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.या ट्रॅक्टरमुळे दुकानदाराचं लाखो रुपयांचं नुकसान झालं. दुकानदारानं केलेल्या दाव्यानुसार ही काच तब्बल ८० हजार रुपयांची होती. सोबतच २० ते २५ हजार रुपयांचं सामानही ट्रॅक्टरने आपल्या चाकाखाली चिरडले. ट्रॅक्टर दुकानात शिरत असल्याचे पाहून शोरूममधील काउंटरवर बसलेल्या तरुणाने तत्काळ हालचाल करत ट्रॅक्टर नियंत्रित केला. त्यानंतर मालकाचा शोध सुरू झाला. यामुळे जिवितहानी टळली. मात्र, या अजब प्रकाराची चर्चा परिसरात दिवसभर सुरू होती.

हा व्हिडीओ ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. सुदैवानं या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. पण नुकसान मात्र खूप झाले आहे. नेटक-यांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत. नेटकरी म्हणतायेत ट्रॅक्टरमध्ये बुल्डोजरची आत्मा शिरली होती पण खरे कारण अजून स्पष्ट नाही.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!