Just another WordPress site

पुण्यातील रिक्षाचालकांनी ‘रॅपिडो’ विरूद्धची लढाई जिंकली

न्यायालयाचा रॅपिडो'ला दणका, रॅपीडोची सेवा 'या' तारखेपर्यंत राहणार बंद

पुणे दि १३(प्रतिनिधी)- पुण्यात रिक्षाचालक आणि रॅपिडो बाईक टॅक्सी सेवामध्ये वाद विकोपाला गेला होता. त्यामुळे रिक्षाचालकांनी रॅपिडो सेवाला ब्रेक लावा अशी मागणी करत मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेतली होती. अखेर न्यायालयाने रिक्षा चालकांच्या बाजूने निर्णय देत रॅपीडोला सेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

GIF Advt

मागील काही दिवसांपासून रॅपिडो बंद करा, अशी मागणी रिक्षाचालकांनी लावून धरली होती. त्यासाठी रिक्षाचालकांनी बंद पुकारत आंदोलन करत रॅपिडोचा निषेध नोंदवला होता. त्यावेळी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रिक्षाचालकाच्या आंदोलनाता तात्पुरती स्थगिती दिली होती. पण रिक्षा चालक आपल्या मागण्यांवर ठाम होते. या प्रकरणी न्यायालयाचे दार ठोठावण्यात आल्याने ‘रॅपिडो’ बाईट टॅक्सी आणि रिक्षाचालकांचा वाद हा उच्च न्यायालयात पोहोचला होता. न्यायालयाने रॅपीडोला आजपासून २० जानेवारीपर्यंत आपली सेवा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बाईक टॅक्सीसोबत कपंनीची रिक्षा, डिलिव्हरी या सेवाही विनापरवाना असल्याचं स्पष्ट झाले आहे. आता पुढील सुनावणी २० तारखेला होणार आहे.रॅपिडो सेवा बंद झाल्यामुळे पुण्यात रिक्षाचालकांनी एकच जल्लोष केला आहे. रॅपिडो सेवा सुरू झाल्यापासून रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम झाला होता. दरम्यान राज्य सरकारने ‘बाईक टॅक्सी’बाबत एक स्वतंत्र समिती तयार केली आहे. ही समिती लवकरच याबाबत आपला अहवाल सादर करेल. मात्र तोपर्यंत ही सेवा तात्काळ बंद करण्याची राज्य सरकारची मागणी होती ती देखील मान्य करण्यात आली आहे. समिती लवकरच आपला अहवाल देणार न्यायालयात सादर करणार आहे.

अनेकांनी रॅपिडोला पसंती देत रिक्षाकडे पाठ फिरवली होती.बेकायदा बाईक टॅक्सी शहरात चालवणाऱ्या रॅपिडो कंपनीच्या मूळ मालकांवर गुन्हे दाखल झाले होते. मध्यंतरी नागरिकांनी रॅपिडो अॅपचा वापर करुन प्रवास करु नये, असे आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिले होते. पण अखेर न्यायालयात रिक्षाने बाजी मारली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!