‘मनसे’ च्या नव्या गाण्यावर जोशात थिरकली प्रसिद्ध अभिनेत्री
आण भवानीची, शान मराठीची गाण्यावर धरला ठेका, व्हायरल व्हिडिओवर मनसैनिक खुश
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी हिचं नाव घेतलं जातं. काही महिन्यांपूर्वी प्राजक्ताची माळीच्या ‘प्राजक्तराज’ या ज्वेलरी ब्रँडची सुरुवात केली. या ब्रँडचे उद्घाटन मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. आता प्राजक्ता मनसेच्या नव्या गीतावर ठेका धरताना दिसली आहे. तिने धरलेल्या ठेक्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळी चांगलीच चर्चेत आली आहे. आणि त्याच कारणही तसंच आहे. प्राजक्ताने एका गाण्यावर नृत्य करत सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. हे गाणं दुसरं तिसरं कसलं नसून राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या सभेत मनसे कार्यकर्त्यांच्या भेटीला आलेलं “प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा” हे आहे.प्राजक्ताचे या गाण्यावर नाचतानाचे हाव भाव सर्वांचेच लक्ष वेधून घेणारे आहेत. फुलाप्रमाणे नाजूक असलेली प्राजक्ता या गाण्यावर नाचताना एखाद्या मनसे कार्यकर्त्यासारखी बिनधास्त आणि बेधडक रूपात पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर अभिनेत्री प्राजक्ताचा हा व्हिडिओ मनसेच्या अधिकृत पेजवरून देखील शेअर करण्यात आला आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीने या गाण्यावर ताल धरल्याने मनसैनिकांचा जोश आणखीन वाढलेला पाहायला मिळतो आहे. दरम्यान अभिनेत्री प्राजक्ता माळी ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते राज ठाकरे यांची मोठी चाहती आहे. राज ठाकरे यांच्याकडून नेहमीच आपल्याला काहीतरी नवं करण्याची प्रेरणा मिळते, असे देखील प्राजक्ताने अनेकदा म्हटले आहे. प्राजक्ताचा हा डान्स पाहून तिच्या चाहत्यांनी या व्हिडिओवर कमेंट करत पसंती दर्शवली आहे.
काही दिवसांपूर्वी प्राजक्ताच्या पोस्ट पाहता ती राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. प्राजक्ताने जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती त्यानंतर तिच्या राजकारण प्रवेशाच्या चर्चा जोरदार रंगल्या होत्या. त्यावेळी ती मनसेत प्रवेश करणार असल्याचंही म्हटलं गेलं होतं. प्राजक्ताने मात्र, या सगळ्या अफवा असल्याचं सांगत या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला होता.