Latest Marathi News
Ganesh J GIF

माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे साप आणि सरड्यासोबत फोटोशुट

हातात साप, खांद्यावर सरडा घेत फोटो, नेटक-यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, म्हणाल्या सर्वात विषारी तर...

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात रोजच नवीन घडामोडी घडत आहेत. पण यापलीकडे जाऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या मात्र वेगळ्याच विश्वास रमल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांचे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सध्या त्या वेगळ्याच कृतीने चर्चेत आल्या आहेत. ते म्हणजे त्यांचे नवीन फोटोशुट पाहूया हे नक्की प्रकरण काय आहे.

अमृता फडणवीस यांनी सोशल मिडीयावर जे फोटो शेअर केले आहेत. ते पाहुन अनेकांना धक्का बसला आहे. अमृता फडणवीस यांनी “सर्वात धोकादायक, विषारी आणि क्रूर प्राणी हा फक्त माणूस आहे,” असं कॅप्शन लिहत त्यांनी आपल्या अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. त्यांनी एका फोटोमध्ये हातावर घोरपड घेतलेली दिसतं आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये त्यांनी दोन्ही हातात साप पकडल्याचे दिसत आहे. अमृता फडणवीस यांनी यावेळी लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसवर अमृता फडणवीस या शोभून दिसत आहेत. अमृता फडणवीस या नेहमी चर्चेत राहतात. यावेळी त्यांचा नवा लूक पाहावयास मिळाला. सध्या त्याची देखील चर्चा होत आहे. दरम्यान मिसेस फडणवीसांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. या पोस्टला अवघ्या काही तासांत हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. अनेक घटना, घडामोडी, सण आदींवर त्या व्यक्त होत असतात. त्याचबरोबर त्या अनेकदा ट्रोल देखील होत असतात. पण त्या ट्रोलिंगकडे अजिबात लक्ष न देता सोशल मिडीयावर सक्रिय असतात.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!