
बुलढाणा दि ३१ (प्रतिनिधी)- बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोनगाव ग्रामपंचायतीचाएक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.यात चक्क ग्रामसेवक सरपंचाला भ्रष्टाचार करण्याचे धडे देत आहे. भ्रष्टाचार निर्मुलनासाठी काहीजण लढत असताना भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोलवर गेल्या असल्याचा अनुभव यामुळे आला आहे.
डोनगाव ग्रामपंचायत सचिव ज्ञानेश्वर चनखोरे डोनगाव ग्रामपंचायतीत नव्याने निवडून आलेल्या महिला सरपंचांना भ्रष्टाचाराचे धडे शिकवितानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. व्हिडीओत सचिव ज्ञानेश्वर चनखोरे, महिला सरपंच रेखा पांडव , महिला सरपंचाचा पती रवी पांडव ,आणि काही सदस्य ग्रामपंचायतीचे कर्मचारी दिसत आहेत. ग्रामसेवक म्हणतो की,”पावसाळा लागला की जनतेच्या प्रश्नावर आपण कान आणि डोळे बंद करून घ्यायचे आणि जसं जळत तसं जळू द्यायचं कारण जनता बदमाश आहे. शिवाय तुम्हाला जनतेने पैसे घेऊनच मतदान केलं आहे. एकाही चोराने फुकट मतदान केलं नाही.मतदान करणारे चोर आहेत. आपण इथं पैसे खाण्यासाठी बसलो असून पैसे खाणे हा आपला अधिकार आहे.” असा परिपाठ त्या व्हिडिओत देत असल्याचे समजते.
संभाषण बाहेर आल्यावर आता ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य आक्रमक असून या सर्व प्रकाराची चौकशी करून या भ्रष्ट ग्रामसेवकावर कारवाईची मागणी आता होऊ लागली आहे. त्यामुळे खरच कारवाई होणार का हे पहावी लागेल.