Just another WordPress site

बहाणा मदतीचा पण डाव बलात्काराचा

भंडा-यात महिलेवर सामूहिक बलात्कार

भंडारा दि ६ (प्रतिनिधी)- भंडा-यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. मदतीचं आश्वासन देऊन एका ३५ वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. तीन नराधमांनी दोन ठिकाणी नेऊन महिलेवर अत्याचार केले. विकृतीचा कळस म्हणजे त्यानंतर त्यांनी महिलेला रस्त्याच्या कडेला फेकून पळ काढला. महिलेवर नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे.

GIF Advt

अत्याचार झालेली महिला आपल्या पतीपासून वेगळी राहत होती. काही दिवसापुर्वी ती गोंदियामध्ये राहणाऱ्या तिच्या बहिणीकडे आली होती. पण बहिणीसोबत भांडण झाल्यानं तिनं रात्रीच्या सुमारास घर सोडलं. ती गोंदियातील गोरेगाव तालुक्यातील कमरगाव या ठिकाणी आईकडे निघाली होती. यावेळी रस्त्यात भेटलेल्या अज्ञात आरोपीनं तिला घरी सोडण्याच्या बहाण्यानं कारमध्ये बसवलं. पण या नराधमानी तिला मुंडीपार जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार ३० जुलैला घडला.दुसऱ्या दिवशीही जंगलात नेऊन अत्याचार केला. त्यानंतर पीडितेला तिला तिथेच सोडून आरोपीनं पळ काढला. जंगलातून आल्यानंतर तीने एका धाब्यावर मदत मागितली. पण आरोपींनी मदत एैवजी तिच्यावर बलात्कार केला.त्यानंतर तिला रस्त्यावर सोडून आरोपींनी पळ काढला.

 

पहाटे कन्हाळ मोह गावाच्या काही नागरिकांनी महिलेला विवस्त्र अवस्थेत पाहिल्यानंतर पोलिसांना कळवले त्यानंतर पोलीसांनी महिलेला रूग्णालयात दाखल केले असून दोन आरोपींना अटक केली आहे.महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला नागपुरातील वैद्यकीय महाविद्यलयात हलवण्यात आले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!