Latest Marathi News
Ganesh J GIF

पाच वर्षानंतर रंगणार आयपीएलचा उद्घाटन सोहळा

बाॅलीवूडचे दिग्गज सितारे करणार परफॉर्म, हार्दिक पांड्या धोनी भिडणार

अहमदाबाद दि २८(प्रतिनिधी)- आयपीएलच्या १६ व्या सिजनची सुरूवात ३१ मार्चला होणार आहे. पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. पण यावेळी प्रेक्षकांना आणखी एक भेट मिळणार आहे.

आयपीएलचा उद्घाटन सोहळा यंदा पार पडणार आहे. कारण यंदा कोरोनाच्या नियमावलीची गरज नसल्याने रंगारंग सोहळा नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडणार आहे. मोठे स्टार्स आयपीएलपूर्वी परफॉर्म करणार आहेत. महिला प्रीमियर लीगचा उद्घाटन सोहळ्यात हिप-हॉप गायक एपी ढिल्लोन, बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि क्रिती सेनन यांनी परफाॅर्म केला होता. तर यंदा आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात रश्मिका मंदान्ना, तमन्ना भाटिया, कतरिना कैफ, टायगर श्रॉफ आणि अरिजित सिंग हजेरी लावणार आहेत. २०१८च्या हंगामापासून आयपीएलमध्ये उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आलेले नाहीत. २०१८ मध्ये परिणीती चोप्रा, वरुण धवन, जॅकलीन फर्नांडिस आणि हृतिक रोशन या भारतीय स्टार्सनी परफॉर्म केला होता. गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यापूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियमवर उद्घाटन सोहळा होणार आहे.

आयपीएलचा २०१९ चा उद्घाटन सोहळा रद्द करून पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या ४० कुटुंबाना आर्थिक मदत करण्यात आली होती तर २०२० ते २०२२ या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला होता.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!