महिला शिक्षिकेने विद्यार्थीनीबरोबर लग्न करण्यासाठी उचलले मोठे पाऊल
मीरा आणि कल्पनाची अनोखी प्रेम कहानी, बघा काय घडल
भरतपूर दि ८(प्रतिनिधी)- राजस्थानमधील भरतपूरमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. भरतपूरमधील एका शाळेतील शिक्षीकेने चक्क आपल्या विद्यार्थीनीबरोबर लग्न केले आहे. यासाठी त्या शिक्षिकेने लिंग बदल करत पुरुष बनली आहे. या लग्नाची सध्या जोरात चर्चा सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भरतपूरमधल्या राजकीय माध्यमिक विद्यालयात मीरा या पीटी टीचर म्हणून कार्यरत आहेत. तर कल्पना नावाची विद्यार्थिनी याच शाळेत शिकते. कल्पना ही उत्तम कबड्डीपटू आहे शिवाय ती तीन वेळा राष्ट्रीय स्तरावर देखील खेळली आहे. कल्पनाचा खेळ मीराला प्रचंड आवडायचा. यातूनच शिक्षिका मीरा विद्यार्थीनी कल्पनाच्या प्रेमात पडल्या. त्यानंतर मीराने कल्पनासमोर आपल्या मनातील भावना व्यक्त केली. याला कल्पनानेही होकाराचा प्रतिसाद दिला. त्यानंतर दोघांमधलं प्रेम फुलले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे दोघींकडच्या कुटुंबियांनी याला आडकाठी केली नाही. लग्नासाठी मीराने पुढाकार घेत लिंगबदल करत पुरूष बनन्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया झाल्यानंतर मीराची आरव बनली. आणि नंतर आरव आणि कल्पनाने लग्न केले.पण आता नोकरीत नाव आणि लिंग बदलावरुन अनेक अडचणीत येत असल्याचं आरवने सांगतिले आहे.
आरवला चार मोठ्या बहिणी असून चारही जणींची लग्न झाली आहेत. तर मीरा म्हणजेच आरवच्या वडिलांनी सांगितले की, मीरा मुलगी असली तरी ती लहानपणापासून मुलासारखीच रहात होती. मुलांबरोबरच खेळत होती, आता ती मुलगाच झाल्याचा मला आनंद आहे. आता आरव आणि कल्पनाच्या संसाराची सुरुवात झाली आहे.