
नव-यामुळे पोलीस आयुक्यालयासमोर पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू
धक्कादायक व्हिडिओ समोर, ओैरंगाबाद पोलिस अॅक्शनमोडवर
ऒैरंगाबाद दि २ (प्रतिनिधी)- नवरा आणि शेजारी आपला छळ करत असल्याची तक्रार करत ऒैरंगाबाद पोलीस आयुक्तालयाच्या पायऱ्यांवर स्वतःला पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेचं नाव सविता काळे असं आहे. तिने गुरुवारी पेटवून घेतले होते. पोलीसांनी हस्तक्षेप केला होता. पण महिला या घटनेत गंभीर जखमी झाली होती.
या महिलेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. नवरा आणि शेजारी मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते. वारंवार पोलिसांत तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याचा आरोप या महिलेनं चिठ्ठी लिहून केला होता. गंगापूर तालुक्यातील मांडवा या गावात ही महिला राहत होती. शेजारच्या महिलेचं ऐकून पतीसुद्धा तिला मारहाण करत असे. शेजारी जोडप्याने पोलिसांचा धाक दाखवून आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप या महिलेने केला होता. आता समोर आलेल्या व्हिडिओमध्ये त्या महिलेला शेजारी राहाणारी एक महिला आणि तिचा पती मारहाण करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे तिने मांडलेली कैफियत खरी असल्याने पोलिस कारवाई करण्याची शक्यता आहे.
पेटवून घेण्याच्या घटनेत घटनेत ७० टक्के भाजलेल्या या महिलेचा आज पहाटे मृत्यू झाला. पती सुद्धा शेजा-यांना साथ देत असल्यामुळे महिला अस्वस्थ झाली होती.अखेर तिचा मृत्यू झाल्याने पोलीस तातडीने कारवाई करण्याची शक्यता आहे.