Latest Marathi News
Ganesh J GIF

एैन सणासुदीत लालपरीची चाके पुन्हा थांबणार

एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी उपोषण, एसटी कामगार आक्रमक, नागरिकांचे हाल होणार?

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे सरकार पुढील अडचणी वाढल्या आहेत. त्यातच एैन गणपती काळात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कारण आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लालपरीची राज्यभरातील सेवा पुन्हा एकदा ठप्प होणार असल्याने जनतेचे हाल होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने विविध प्रकारच्या २९ प्रलंबित मागण्यांसाठी १३ सप्टेंबरपासून राज्यभरात बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी ११ व १२ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत. जर या दोन दिवसात सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सकारात्मक निर्णय न घेतल्यास १३ सप्टेंबरपासून राज्यभरात एसटी कामगार संघटनेतर्फे उपोषण पुकारले जाणार आहे. एसटी महामंडळाने महागाई भत्ता, घरभाडे आणि वार्षिक वेतन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. आम्ही मागणी केलेल्या मागण्यांची अद्याप पूर्तता न केल्याने आम्ही उपोषणाचा निर्णय घेतला आहे. राज्यात आमचे ५० हजार सभास्द असून, आम्ही उपोषण सुरू केल्यावर एसटी महामंडळातर्फे जी कारवाई होऊन त्या कारवाईला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिला आहे. तर जे कर्मचारी या उपोषणात सहभागी होतील, अशा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश राज्यातील सर्व विभाग नियंत्रक यांना दिले आहेत. अशी माहिती एसटी महामंडळाचे सामान्य प्रशासन विभागाचे महाव्यवस्थापक अजित गायकवाड यांनी दिली आहे. दरम्यान विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या वर्षी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभरात एकाच वेळी बेमुदत संप पुकारला होता. या वेळी महामंडळाने अनेक मागण्या मान्य केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला होता.

ठाकरे सरकारच्या कार्यकाळात सर्वात मोठे आव्हान ठरलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हे होते. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, अशी कामगारांची शेवटपर्यंत मागणी होती. यासाठी सुमारे सहा महिने एसटी कामगार मुंबईतील आझाद मैदानावर ठाण मांडून होते. दरम्यान संघटनेंच्या प्रतिनिधींसोबत एसटी महामंडळाने चर्चा सुरु केली असून त्यात काय निर्णय होणार हे पहावे लागणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!