Latest Marathi News
Ganesh J GIF

…आणि वरमाळा घालताच नवरी स्टेजवर कोसळली

लग्नाच्या आनंदावर दुःखाचे विरजण, नवरीचा तो क्षण कॅमे-यात कैद

लखनऊ दि ५(प्रतिनिधी)- उत्तर प्रदेशात लखनौमध्ये लग्न सोहळ्याचा क्षण काही सेकंदात उद्ध्वस्त झाला. वधूनं नवरदेवाला वरमाला घालताच तिचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मलिहाबाद क्षेत्रातील भदवाना गावातील ही घटना आहे.

राजपाल यांची मुलगी शिवांगी हिचा विवाहसोहळा होता. बुद्धेश्वर येथून नवरदेवाची वरात आली होती. लग्न सोहळ्यात सगभागी झालेल्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद होता. वऱ्हाडी मंडळींचं जेवण सुरू झालं होतं. स्टेजवर वधू आणि वराचा वरमाला घालण्याचा विधी सुरू होता.
वर आणि वधू एकमेकांसमोर उभे होते. नवरदेवानं वधू शिवांगीच्या गळ्यात साताजन्माची सात देण्याचं वचन देत वरमाला घातली. त्यानंतर शिवांगीची वरमाला घालण्याची वेळ आली. शिवांगीनं जसं नवरदेव विवेकच्या गळ्यात वरमाला घातली तशीच ती जागीच कोसळली. यानंतर एकच गोंधळ झाला.शिवांगी खाली कोसळताच तिला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. पण रुग्णालयात पोहोचण्याआधीच तिचा मृत्यू झाला होता. शिवांगीला हार्टअ‍ॅटक आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. आणि आनंदाचे वातावरण दुःखात बदलले. लग्नात अनेकांच्या हातात मोबाईल कॅमेरा होते, ते सगळे आनंदाचा क्षण कॅमेऱ्यात कैद करत असताना नवरीच्या अखेरचा क्षण देखील त्यांच्या कॅमे-यात कैद झाला.

नवरीची तब्येत लग्नाच्या दिवशी खराब होती. डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता तिचा रक्तदाब कमी असल्याचं सांगितलं. त्यानंतर काही वेळाने तिला बरं वाटलं म्हणून लग्नाचे कार्यक्रम सुरुच ठेवण्यात आले.पण अचानक नवरी स्टेजवर कोसळली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!