Latest Marathi News
Ganesh J GIF

विमान हवेत असताना प्रवाशांची तरुणाला बेदम मारहाण

मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, पोलीसांनी तरुणालाच केली अटक, धक्कादायक कारण समोर

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये होणारी हाणामारी नेहमीचीच झाली आहे. पण त्याचबरोबर आता मेट्रो आणि विमानामध्ये देखील हाणामारीच्या घटना वाढल्या आहेत. तसेच सोशल मीडियावर या हाणामारीचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल देखील होत असतात. आता अशाच एक व्हिडिओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.

सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ गुवाहाटी ते आगरताळा या विमानातील आहे. गुवाहाटीहून अगरतळाला एक विमान चालले होते. यावेळी अमली पदार्थ सेवन केलेल्या प्रवाशाने आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. यानंतर सहप्रवाशांनी संबंधित प्रवाशाला मागे खेचत जोरदार मारहाण केली. व्हायरल व्हिडिओत दिसत आहे की, विमानाचे क्रू मेंबर्स आणि इतर काही प्रवासी आरोपी तरुणाला धरून ठेवताना दिसत आहे. यावेळी संतापलेल्या काही प्रवाशांनी त्या तरुणाला जोरदार मारहाण केली. क्रू मेंबर्संनी मारहाण न करण्याची विनंती करत होते. पण प्रवाशी काहीच ऎकण्याच्या मनस्थितीत नव्हते. दरम्यान अगरतळा विमानतळावर विमान उतरल्यानंतर पोलिसांनी आरोपी प्रवाशाला अटक केली आहे. त्याच्यावर क्रू मेंबरबरोबर गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पण सोशल मिडीयावर व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

काही दिवसापूर्वी विमानात विंडो सीटवरुन लोकल ट्रेन स्टाइला राडा घडल्याचा प्रकार माल्टावरुन लंडनला जाणाऱ्या रेयान एअर एअरलाइन्सच्या विमानात घडली होती. तर फ्रंटियर एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये दोन प्रवाशी महिलांमध्ये मोठे भांडण झाल्याची घटना समोर आली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!