राष्ट्रवादी काँग्रेसचे हे १४ आमदार लवकरच शिंदे गटात?
शिंदेना धनुष्यबाण मिळाल्यानंतर पक्षात जोरदार इनकमिंग, राष्ट्रवादीला खिंडार
रत्नागिरी दि १९ (प्रतिनिधी)- निवडणूक आयोगाने शिवसेनेचा धनुष्यबाण एकनाथ शिंदेच्या हाती सोपवल्यानंतर शिंदे गटात जोरदार इनकमिंग होत आहे. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खेडमधील सभेपूर्वी उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी मोठा दावा केला आहे. विरोधी पक्षातील जवळपास १४ आमदार येण्यास इच्छुक असल्याचा दावा मंत्री सामंत यांनी केला आहे.
शिंदेंच्या शिवसेनेचे नेते व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पक्षप्रवेशाबाबत मोठा दावा केला आहे. ते म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि शिवसेना ठाकरे गटाचे कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भातले १३ ते १४ आमदार आमच्या पक्षात प्रवेश करणार एवढं नक्की, कोण आमच्यात येणार आहेत ते त्यांना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती आहे. असे म्हणत सामंत यांनी विरोधकांना खिंडार पडणार असल्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर आजची सभा काही प्रत्युत्तर देण्यासाठी नाही. ५ तारखेच्या सभेत ठाकरेंनी सांगितले की, माझ्याकडे द्यायला काहीच नाही. मात्र आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच यावर बोलतील. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. मी भरभरून देणारा आहे. जे जे काही कोकणाला देण्यालसारखं आहे. आणि त्याचीच उधळण मुख्यमंत्री शिंदे आजच्या सभेत करतील. आमचे हात रिकामे आहेत, तरीही तुम्ही सोबत राहिलात, अशी सहानुभूती मिळवणारे भाषण शिंदे करणार नाहीत, असा ही टोला सामंत यांनी ठाकरेंना लगावला आहे. यावेळी सामंत यांनी अनंत गीते यांच्यावर देखील टिका केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज शिंदे गटातील नेते रामदास कदम यांच्यासाठी आज कोकणच्या खेडमध्ये सभा होणार आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी सभा पार पडली होती. पण ती जी सभा झाली त्याला आपण सभा म्हणू शकत नाही. त्याच्यामध्ये विचार नव्हता, असेही सामंत म्हणाले आहेत.