Latest Marathi News
Ganesh J GIF

नालासोपाऱ्यात चोरट्यांचा धुमाकूळ! बंद घरं टार्गेट करणाऱ्या गॅंगचा सीसीटीव्हीत भांडाफोड; पोलिसांसमोर तपासाचे आव्हान.

सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु आहेत. शाळा, कॉलेज बंद असल्याने मुंबईत नोकरी, व्यवसायासाठी आलेली कुटुंबे गावी जात आहेत. हीच संधी साधून सुट्टी निमित्त गावी गेलेल्या बंद घरांना चोरट्याकडून लक्ष केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.विरारमध्ये भर दिवसा घरफोडीचा प्रयत्न CCTV मध्ये कैद झाला आहे.सहा अधिकारी, तब्बल 6 तास चौकशी! रुपाली चाकणकरांवर प्रश्नांचा भडीमार; SIT ने काय काय विचारलं?

बंद घरे टार्गेटवर, वसईमध्ये धक्कादायक प्रकार
समोर आलेल्या माहितीनुसार, वसई विरार, नालासोपारा परिसरात घर फोड्यांचे प्रमाण वाढत आहे. सुट्टी निमित्त गावी गेलेल्या किंवा बंद घरांना चोरट्याकडून लक्ष केलं जात आहे. असाच एक प्रकार विरार पूर्वेतील वरदविनायक लेन परिसरातल्या नूतनगंगा सोसायटीमध्ये भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटचे कुलूप कापून घरात घुसण्याचा प्रयत्न केला.

या संपूर्ण घटनेचे CCTV फुटेजही समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दुपारी १ ते ३.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. घरातील सदस्य बाहेर गेल्याचा फायदा घेत अज्ञात चोरटे फ्लॅटपर्यंत पोहोचले आणि दरवाज्याचे लॉक कापण्याचा प्रयत्न केला. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, विरार पूर्व परिसरात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असून, लोक ऑफिसला किंवा गावी गेल्यानंतर बंद घरांना लक्ष्य केले जात आहे.दरम्यान, घटनेची माहिती तात्काळ विरार पोलीस ठाण्याला देण्यात आली असून, पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. तसेच परिसरातील सर्व सोसायट्यांनी सतर्क राहून सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!