Latest Marathi News

या अभिनेत्री खासदाराने आदिवासी नृत्यावर धरला ठेका

अभिनेत्री खासदाराची आदिवासी बांधवांसोबत होळी, नृत्याचा व्हिडिओ व्हायरल

अमरावती दि ६(प्रतिनिधी)- आपल्या कृतीमुळे वादग्रस्त ठरणारे जोडपे म्हणजे राणा दांपत्य. नुकतीच खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची बाईक सवारी चांगलीच चर्चेत आली होती. आता होळीनिमित्त आमदार रवी राणांच्या ढोलकी वर खासदार नवनीत राणा यांनी ताल धरला होता.


आपल्या विधानांनी कायम चर्चेत राहणाऱ्या दांपत्याने आज राजकारणासह सर्वच प्रकारचे तणाव विसरून या जोडीने आदिवासी बांधवांसोबत होळीचा आनंद लुटला. होळीनिमित्त मेळघाटातील प्रत्येक गावात आदिवासी बांधव नृत्य सादर करून आनंद लुटत असताना, त्यांच्या गावात पोहोचलेल्या खासदार नवनीत राणा यादेखील आदिवासी बांधवांसोबत नृत्यावर ठेका धारला. यावेळी आमदार राणा देखील ढोलकी वाजवताना दिसले. एकंदरीत त्यांनी आदिवासी बांधवांच्या होळी उत्सवात नवा उत्साह निर्माण केला आहे.राणा दाम्पत्य गेल्या १२ वर्षांपासून होळी ही आदिवासी भागात साजरी करतात. त्यामुळे यंदाही ते त्याठिकाणी गेले होते. नवनीत राणा यांनी नृत्याचा व्हिडिओ आपल्या सोशल मिडीया अकाउंटवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा आपल्या युवा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांबरोबर ४ ते ८ मार्चपर्यंत मेळघाटातील अतिदुर्गम गावात जावून आदिवासींच्या समवेत होलिकोत्सव साजरा करणार आहेत.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या अनेकदा आपल्या स्टाईलमुळे चर्चेत असतात. त्याचबरोबर राजकीय वर्तुळातील लोकप्रिय व रोमँटिक कपल म्हणून नवनीत राणा-रवी राणा यांच्याकडे पाहिलं जाते. एका सामुदायिक विवाह सोहळ्यात त्यांनी २०११ साली लग्नगाठ बांधली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!