हनुमानाच्या मूर्तीसमोर तोकड्या कपड्यात महिलांचे बाॅडी बिल्डिंग
तोकड्या कपड्यातील स्पर्धेचा व्हिडिओ व्हायरल, भाजपाकडून हनुमानाचा अपमान
रतलाम दि ६(प्रतिनिधी)- रतलाम शहरात रविवारी झालेल्या १३ व्या ज्युनियर बॉडी बिल्डिंग स्पर्धेत महिला स्पर्धकांच्या स्टेजवरील परफॉर्मन्सवरून वाद निर्माण झाला आहे. कारण या महिला स्पर्धकांनी हनुमानाच्या मूर्तीसमोर तोकड्या कपड्यात परफाॅर्म केला आहे.
रतलाम येथील आमदार सभागृहात रविवारी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्र, हरियाणा आणि कर्नाटकातील शरीरसौष्ठवपटूंसह सुमारे ३५० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. रतलामचे नगराध्यक्ष प्रल्हाद पटेल यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या जन्मदिनानिमित्ताने रतलाम येथील भाजप महापौरांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. बॉडी बिल्डिंग स्पर्धेच्या नावाखाली महिला स्पर्धकांकडून अश्लील परफॉर्मन्स केल्याचा प्रकार समोर आला आहे. हनुमानजींच्या मूर्तीसमोर महिलांनी अश्लील कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. हिंदू संघटनांनी यावर आक्षेप घेतला, तर काँग्रेस नेतेही मैदानात उतरले आणि त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

रतलाम महापौर के मुख्य आतिथ्य में भगवान हनुमान जी की मूर्ति रखकर अश्लील प्रदर्शन वह भी मुख्यमंत्री जी के जन्मदिन के मौके पर।सनातन संस्कृति को बेचखाने वाले इस नेता पर क्या कार्यवाही होगी शिवराज जी? @BJP4India @OfficeOfKNath @digvijaya_28 @inc_jpagarwal pic.twitter.com/Xebc6dLKOW
— Bhupendra Gupta Agam (@BhupendraAgam) March 5, 2023
बजरंग बलीच्या पुतळ्यासमोर झालेल्या महिला बॉडीबिल्डरच्या स्पर्धेचा निषेध करत काँग्रेसने धान मंडी परिसरात हनुमान चालिसाचे पठण केले. विशेष म्हणजे भाजप सरकारचे माजी गृहमंत्री हिम्मत कोठारी हेही या आंदोलनात सहभागी झाले होते.