Latest Marathi News
Ganesh J GIF

आजारापणामुळे या अभिनेत्रीने घेतला चित्रपटातून संन्यास?

भावनिक पोस्ट करत चाहत्यांना दिली माहिती, या आजाराने अभिनेत्री त्रस्त, म्हणाली आपल्यासमोर काय येणार...

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- आपल्या अभिनयाने लोकांच्या मनात स्थान करणारी दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या मायोसायटिस या ऑटो इम्युन विकाराशी लढा देत आहे. आरोग्याच्या या समस्येमुळे समंथा रुथ प्रभू अभिनय क्षेत्रात एक वर्षाचा ब्रेक घेणार आहे. पण नुसत्या घोषणेमुळेच या अभिनेत्रीला कोट्यवधी रूपयांचा फटका बसला आहे. गेल्या वर्षीच तिने आपल्या आजाराविषयीचा खुलासा सोशस मीडियावरुन केला होता.

समंथा मायोसायटिस या आजाराने त्रस्त आहे. त्यामुळेच ती
‘सिटाडेल’ आणि ‘कुशी’ या आगामी सिनेमांनंतर कोणतेही प्रोजेक्ट स्वीकारणार नाही. त्या दोन्ही प्रोजेक्ट्सचं शूट पूर्ण झालं आहे. तिने काही प्रोजेक्ट्ससाठी अ‍ॅडव्हान्स म्हणून घेतलेली रक्कमही निर्मात्यांना परत केल्याची चर्चा आहे. पण यामुळे तिचे मोठे नुकसान होणार आहे. समंथा एका फिल्मसाठी सर्वसाधारणपणे साडेतीन ते चार कोटी रुपये मानधन घेते. तिने अलीकडेच तीन चित्रपट साइन केले होते. त्यावरून असा अंदाज बांधता येतो, की तिचं १० ते १२ कोटी रुपयांचं संभाव्य नुकसान होणार आहे. समंथाने चित्रपटांमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे, तेव्हापासून तिच्या चाहत्यांमध्ये दुःखाची लाट पसरली आहे. सध्या समांथा केवळ स्वतःच्या तब्येतीवर लक्ष देणार आहे. ‘सिटाडेल इंडिया’ प्रोजेक्टचं शूटिंग संपलं, तेव्हा समंथाने एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली होती. त्यावेळी ती म्हणाली की, ‘… आणि ‘सिटाडेल इंडिया’चं शूटिंग संपलं. आपल्यासमोर काय येणार आहे याची कल्पना असेल तर ब्रेक घेणं काही वाईट गोष्ट नाही,’ अशा भावना तिने व्यक्त केल्या होत्या. दरम्यान समंथा मायोसिटिस नावाचा आजार झाला आहे. त्यामुळे तिला तिच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. याच कारणामुळे तिने कामातून ब्रेक घेतला आहे. या आकारामुळे एक दिवस असा होता जेव्हा तिला चालता – फिरता देखील येत नव्हते. यासाठी ती काही दिवसापुर्वी आजारी पडल्यामुळे रूग्णालयात दाखल झाली होती.

समंथा हिच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच ‘खुशी’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अभिनेत्रीसोबत विजय देवरकोंडा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात दोघांचे रोमाँटिक सीन असल्यामुळे सिनेमा प्रदर्शनापूर्वी चर्चेत आला आहे. सध्या सर्वत्र समंथा हिच्या आगामी सिनेमाची चर्चा रंगत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!