Latest Marathi News
Ganesh J GIF

तरूणीने सीएची परिक्षा पास केली पण मुलाखती आधीच घडले असे काही…

स्वप्न सत्यात उतरण्यासाठी काही तास उरले असताना अघटित घडले, वैष्णवीसोबत काय घडले?

नागपूर दि २२(प्रतिनिधी)- नागपुरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. व्हॅनने चिरडल्याने एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना भरतनगरमध्ये घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की ती व्हॅनखाली पडली आणि अक्षरशः ५० फूट फरफटत गेली. तरुणी नुकतीच सीए परीक्षा उत्तीर्ण झाली होती.

वैष्णवी गणेश धर्मे असे मृत मुलीचे नाव आहे. वैष्णवीने १५ दिवसांपूर्वीच सीएची परीक्षा उत्तीर्ण झाली होती. ती सीताबर्डी येथील एका कंपनीत काम करत होती. मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवीला एका कंपनीत ऑनलाईन मुलाखात द्यायची होती. त्यामुळे ती स्कूटीवरुन घराकडे निघाली होती. मात्र घरी परततानाच काळाने तिच्यावर घाला घातला. घरी जाताना एका भरधाव व्हॅनने वैष्णवीला धडक दिली आणि तिला चिरडत नेले. अपघातानंतर वैष्णवी व्हॅनच्या चाकाखाली अडकून पडली होती. वैष्णवी अक्षरशः व्हॅनच्या धडकेनंतर ५० फूट लांब उडून पडली. तिने हेल्मेट घातले असले तरी तीच्या यकृताला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली होती. घटनास्थळी उपस्थित लोकांनी तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. वैष्णवीचे आई-वडील उत्तर प्रदेशात देवदर्शनासाठी गेले होते. त्यांना या अपघाताबद्दल कळवण्यात आले. ते विमानाने नागपूरला पोहोचले. मात्र, उपचारादरम्यान मध्यरात्रीनंतर वैष्णवीचा मृत्यू झाला. स्थानिक पोलिसांनी याप्रकरणी घटनेची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. चालक निष्काळजीपणे गाडी चालवत असल्यामुळेच हा अपघात झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान मुलाखतीची औपचारिकता पार पडणार आणि प्रगतीचे पंख लागणार असेच चित्र होते. मात्र अचानक नियतीचे चक्रच फिरले आणि मुलाखतीच्या काही तास अगोदर एका व्हॅनच्या रूपात काळाने तिच्यावर घाला घातला आहे.

वैष्णवी सीएसारखी खडतर परीक्षा उत्तीर्ण झाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. तरुणीचे पालक आनंदीत होते. मात्र एका घटनेमुळे त्यांचे सारं जगच बदललं आहे. व्हॅनचा चालक राँग साइडने गाडी चालवत होता. तसेच त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्सदेखील नव्हते. याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!