ही अभिनेत्री म्हणते ‘प्रेम आहे माझं, माझ्या मराठीवर उद्या, परवा, मरणोत्तरही…’
पारंपारिक फोटो शेअर करत अभिनेत्रीने दिलेल्या शुभेच्छा व्हायरल, कविता तर वाचाच
मुंबई दि २७(प्रतिनिधी)- आज मराठी भाषा गौरव दिन आहे. राज्यात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जात आहे. तसेच एकमेकांना शुभेच्छा देखील दिल्या जात आहेत. पण आपले मराठी कलाकार तर मागे का राहतील. अभिनेत्री प्राजक्ता माळीने देखील खास पोस्ट करत मराठी भाषा गाैरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. प्राजक्ता माळीने तिचे फोटो शेअर करत मराठी भाषा गाैरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ती फोटोत मराठमोळ्या लूकमध्ये पाहायला मिळत आहे. तिने नऊवारी साडी, गळ्यात पारंपारिक दागिने, आणि नाकात नथ घातली आहे. तसेच पोस्टच्यस कॅप्शनद्वारे तिने एक कविता शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. “प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं..
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं.
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं..
मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं.
कवीश्रेष्ठ कुसूमाग्रजांनी लिहीलेल्या ह्या ओळींसारखंच प्रेम आहे माझं, माझ्या “मराठीवर”.
जे आहे आज, राहील उद्या , परवा..मरणोत्तरही…
“मराठी भाषा गौरव दिनाच्या”; महाराष्ट्राला आभाळभर शुभेच्छा.”, अशी पोस्ट प्राजक्ताने केली आहे. त्याचबरोबर फोटोंमधले अलंकार आपल्या प्राजक्तराजचे असल्याचे सांगत मी मराठी, माझी मराठी, मातृभाषा, मराठी मुलगी, सह्याद्रीची लेक असे हॅशटॅग देखील प्राजक्ताने वापरले आहेत.एकंदरीत अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने हटके अंदाजात मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या अभिनय, सूत्रसंचालन, आणि नृत्याने प्राजक्ताने आपली वेगळी छबी निर्माण केली आहे. तसेच व्यवसायात पदार्पण करत तिने प्राजक्तराज’ हा पारंपरिक मराठी दागिण्यांचा साज घेऊन ती पुढे आली आहे. प्राजक्ताने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे. तसेच ती लवकरच एका चित्रपटातही झळकणार आहे.