बाॅलीवूडमधील ही अभिनेत्री रूग्णालयात दाखल
अभिनेत्रीला या आजाराची लागण, चाहत्यांना दिली हेल्थ अपडेट, चाहते चिंतेत, पहा काय झाले?
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- बाॅलीवूड मधील प्रतिथयश अभिनेत्री जरीन खानची तब्येत अचानक बिघडल्याने तिला तातडीने रूग्णालयात दाखल करावे लागले आहे.जरीनला डेंग्यूची लागण झाली असून तिला तापासोबतच अंगदुखीचा त्रास होत आहे. त्यामुळे तिला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. मुंबईत डेंग्यूचे रुग्णात कमालीची वाढ झाली आहे.
अभिनेता सलमान खानच्या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री झरिन खान सध्या सिनेसृष्टीतून गायब आहे.पण सोशल मिडीयावर ती कमालीची सक्रिय असते. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत झरिनने ही माहिती दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्री तिच्या हातावरील सलाईनचा फोटो पोस्ट करत ”रिकव्हरी मोड” असे कॅप्शन दिले आहे. थोड्याच वेळात तिने ही पोस्ट काढून टाकली. त्यानंतर तिने ज्यूसचा ग्लास असलेला आणखी एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. या फोटोला तिने ‘रिकव्हरी मोड’असे कॅप्शन दिले आहे. तसेच डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन तिने चाहत्यांना केले आहे. तसेच मुंबईत सध्या डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. सध्या डेंग्यूच्या केसेस वाढत असून, अशा परिस्थितीमध्ये आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा आणि डासांना घरात येऊ देऊ नका असेही ती म्हणाली आहे. ती लवकर बरी व्हावी अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. दरम्यान आता तिची तब्येत पूर्वीपेक्षा बरी असून ती रिकव्हर होत आहे.
जरीन खान बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. ‘हेट स्टोरी ३’, ‘वीर’, ‘वजा तुम हो’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. अभिनेत्रीला कतरिना कैफची कॉपी म्हटले जाते. पण त्यामुळे आपले नुकसान झाल्याचे ती एका मुलाखतीत म्हणाली होती.