Latest Marathi News
Ganesh J GIF

ही प्रसिद्ध अभिनेत्री पुन्हा एकदा दिसणार ऐतिहासिक भूमिकेत

सोशल मिडीयावरील पोस्टची जोरदार चर्चा, तुम्हीही कराल काैतुक, म्हणाली आनंदाची बातमी...

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- मराठीत नुकताच प्रदर्शित झालेला महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर झळकलेली अभिनेत्री अश्विनी महांगडे आणखीन एका चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाली आहे. इन्स्टा पोस्ट करत तिने याची माहिती चाहत्यांना दिली आहे.

अश्विनी महांगडे नुकतीच महाराष्ट्र शाहीर चित्रपटात झळकली. यात तिने साकारलेल्या भूमिकेचं सर्वत्र खूप कौतुक झाले. त्यानंतर आता ती आणखी एका चित्रपटात झळकणार आहे. अश्विनीने चित्रपटाचे पोस्टर शेअर करत लिहिले की, इंदूर संस्थानचे संस्थापक, वीर सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन करते. आज अतिशय आनंदाची बातमी माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. खुप मोठी जबाबदारी, मनावर दडपण आणि तितकाच आनंद होत आहे. माझी प्रमुख भुमिका असलेला “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर” या चित्रपटाची आज घोषणा झाली. रसिक मायबाप प्रेक्षकहो याही चित्रपटावर आपण प्रेम करावे. तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. अश्विनी महांगडेची मुख्य भूमिका असलेला हा तिचा पहिलाच चित्रपट आहे.  अहिल्याबाई होळकर यांच्या रूपात अश्विनी महांगडे दिसत आहे. तिच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. अश्विनीचे चाहते तिला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. आता अहिल्याबाई होळकर यांचा इतिहास प्रेक्षकांना लवकरच अनुभवता येणार आहे. दरम्यान अश्विनी महांगडे एक उत्तम अभिनेत्री तर आहेच पण ती सामाजिक कार्यात देखील तितकीच सक्रीय असते. अश्विनी सोशल मीडियावर देखील चांगली सक्रीय असते.

अश्विनीने यापूर्वी महाराष्ट्र शाहीर, बॉईज चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. शिवाय स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमुळे ती ”शिवकन्या राणू अक्का” म्हणूनही सगळ्यांमध्ये प्रसिद्ध आहे. अश्विनीची फॅन फॉलोईंग प्रचंड आहे. त्यांना आता तिच्या आगामी चित्रपटाची उत्सुकता असणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!