
ही प्रसिद्ध बाॅलीवूड अभिनेत्री लढणार लोकसभा निवडणूक?
महिला विधेयकाला मंजुरी मिळाल्याने अभिनेत्री आनंदित म्हणाली मी नक्कीच निवडणूक लढवणार, पक्षही ठरला?
दिल्ली दि १९(प्रतिनिधी)- देशातील संसदेचे कामकाज आजपासून नवीन इमारतीत सुरू करण्यात आले आहे. या इमारतीत आजच्या कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी अनेकांना आमंत्रित करण्यात आले होते. यात अभिनेत्री ईशा गुप्ता आणि कंगणा रणावत यांचा समावेश होता. दोघांनी नव्या संसद भवन परिसरातले फोटो शेअर केले आहेत. यातच ईशाने एक मोठी घोषणा केली आहे.
ईशा गुप्ताने संसद भवन गाठून निवडणूक लढवण्यासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. संसदेत आज महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आले. या विधेयकावर बॉलिवूड अभिनेत्री इशा गुप्ताने प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली “पंतप्रधानांनी हे विधेयक सादर केल्यामुळे खूप चांगली गोष्ट झाली आहे. हा विधेयक म्हणजे देशासाठी एक प्रगतीशील विचार आहे. या आधीही अनेकदा पंतप्रधानांनी देशातल्या नागरिकांसाठीच नाही तर महिलांसाठीही उत्तमोत्तम योजना आखल्या आहेत. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या सारख्या अनेक योजना मोदी सरकारने महिलांसाठी राबवल्या आहेत. या आरक्षण विधेयकामुळे महिलांना समान अधिकार मिळणार आहे. कोणतेही नवीन काम सुरू करताना लक्ष्मीपासून सुरूवात होत असते. त्यामुळे मला वाटते की, भारत किती विकसित देश होत चालला आहे हे यातून दिसते. कारण आपण लक्ष्मीवर जास्त लक्ष केंद्रीत करतो आहोत” अशी भावना ईशाने व्यक्त केली आहे. पण जेंव्हा तिला निवडणुक लढवणार का असे विचारण्यात आले. तेंव्हा ती म्हणाली की, मला राजकारण लहानपणापासून आवडते. याशिवाय माझे कुटुंब राजकारणात सक्रिय आहे, त्यामुळे तुम्ही मला २०२६ मध्ये या ठिकाणी पाहू शकाल. त्यामुळे ती कोठून निवडणुक लढणार हे पहावे लागेल.
अभिनयासोबतच ईशा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ती लवकरची बिग बॉस ओटीटी २ विजेता एल्विश यादवसोबत एका गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच ईशा गुप्ता दररोज तिचे बोल्ड आणि सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.