Latest Marathi News
Ganesh J GIF

सुभाष देसाईंचे पुत्र भुषण देसाई शिंदे गटात प्रवेश करणार

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, मुलानंतर सुभाष देसाईही शिंदे गटात प्रवेश करणार?

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या हातातून निसटले आहे. पण तरीही ठाकरेंच्या अडचणी संपण्याचे नाव घेत नाही. आता ठाकरेंचे विश्वासू नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे.त्यामुळे खळबळ उडाली आहे.

यापूर्वी शिवसेनेच्या अनेक बड्या नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. याआधी गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता, तर त्यांचा मुलगा ठाकरे गटात आहे. पण आता देसाई कुटुंबात फूट पडण्याची शक्यता आहे. बाळासाहेब भवनात मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत भूषण देसाई यांचा पक्ष प्रवेश होण्याची शक्यता आहे. देसाई अत्यंत निकटवर्तीय असल्यानं ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे.भूषण देसाई यांच्यासोबत अनेक कार्यकर्तेही शिवसेनेत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण भूषण देसाई शिंदे गटात आल्यास शिंदे गट आणि भाजपात वाद होण्याची शक्यता आहे.कारण चार महिन्याखाली भाजपने भूषण देसाई यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. प्रसाद लाड यांनी भूषण देसाई यांच्यावर वसुलीचे गंभीर आरोप केले होते. भूषण देसाई यांच्यावर एजंटगिरीचे आरोप केले होते. पण आता भुषण यांच्यावरील आरोपाचे काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.शिंदे गटाला मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे तर उद्धव ठाकरे यांच्यापुढील आव्हाने अधिक खडतर होताना दिसत आहे. भूषण देसाई यांच्यानंतर सुभाष देसाई शिंदे गटात प्रवेश करणार का? याची चर्चा रंगली आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उभ्या शिवसेनेत फूट पडली होती. तब्बल ४० आमदार आणि १३ खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. राज्यात त्यानंतर सत्तांतर झाले. शिवसेना कुणाची यावरुन सध्या सर्वोच्च न्यायालयात जोरदार अशी लढाई सुरु आहे. त्याचबरोबर राज्यातही संघर्ष सुरू आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!