Latest Marathi News

भारतातील या आयपीएल सुंदरीला आफ्रिकेतुन लग्नाचा प्रपोज

आयपीएल क्रशचा आफ्रिकेत बोलबाला, प्रपोजचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- सनरायझर्स हैद्राबादची मालकीन आणि आपल्या सुंदरतेने अनेकांना घायाळ करणाऱ्या काव्या मारनचे चाहते फक्त भारतातच नाही तर जगभरात आहेत. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात एका पठ्ठ्याने थेट काव्यालाच प्रपोज केले आहे.

सनरायजर्सच्या काव्याची सौंदर्यता पाहून तिला नॅशनल क्रश देखील म्हटले जाते. पण या काव्याची जादू केवळ आयपीएलमध्येच नाही तर आता साऊथ अफ्रिकेतही पाहायला मिळत आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेत आयपीएलच्या धर्तीवर एक लीग खेळली जात आहे. यात काव्याने सनरायझर्स इस्टर्न कॅप हा संघ खरेदी केला आहे. यावेळी सामन्यात एका प्रेक्षकाने काव्या मारनला लाईव्ह मॅचमध्ये लग्नाची मागणी घातली. त्याने कार्डबोर्ड वर “Kavya Maran Will You Marry Me” असे लिहिले होत आणि त्यानंतर त्याच्यावर कॅमेरामनची नजर गेली. त्यानंतर त्याने सर्व प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.सोशल मीडियावर सध्या हा विषय चर्चेत आहे. एसए20 लीगच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरूनही हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. आता काव्या आफ्रिकेची सुन होणार का? हे पहावे लागेल.

काव्या सन नेटवर्कचे मालक कलानिधि मारन यांची मुलगी आहे. काव्या सनरायझर्स फ्रँचायझीचा कारभार पाहत असते.आयपीएलमध्ये काव्या पहिल्यांदा पाहायला मिळाली, तेव्हा मिस्ट्री गर्ल म्हणून तिची चांगलीच चर्चा झाली. आता तिचे ओखळ सर्वांना माहिती आहे.पण माध्यमांमध्ये आयपीएल क्रश असा तिचा उल्लेख केला जातो. तिचे मोठ्या संख्येने चाहते आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!