ही मराठी अभिनेत्री लग्नासाठी तयार पण घातली एकच अट
महाराष्ट्राची क्रश असलेल्या अभिनेत्रीच्या मनात कोण आहे? अभिनेत्रीनेच केला खुलासा
मुंबई दि २५(प्रतिनिधी)- मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी जितकी बोल्ड आणि बिंधास्त म्हणून ओळखली जाते तितकीच ती रिअल लाईफमध्ये अध्यात्मिक आहे. नुकताच तिचा श्री श्री रविशंकर यांच्याबरोबरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात तिने आपल्या लग्नाबद्दल एक वक्तव्य केले आहे. सध्या तिच्या त्या वक्तव्याची चर्चा होताना दिसत आहे.
श्री श्री रविशंकर यांच्या प्रवचनात सहभागी झालेल्या प्राजक्ता माळीने सर्वांसमोरच गुरुंना प्रश्न विचारला की, ‘लग्न करणं सगळ्यांना अनिवार्य आहे का?’ प्राजक्ताचा हा प्रश्न ऐकून रविशंकर मिश्कीलपणे म्हणतात,’तुम्ही हे मला विचारत आहात? असं असतं तर कधीच माझ्या बाजूला आणखी एक खुर्ची असती.’रविशंकर यांची प्रतिक्रिया येताच प्राजक्तासह सर्वच उपस्थितांना त्याला हसून दाद दिली. त्याचबरोबर त्यांनी तुम्हाला काय आवडतं ते करा. फक्त आनंदी राहा.’असा सल्ला देखील दिला आहे. योगायोग म्हणजे प्राजक्ताच्या लग्नाच्या अटींबाबत एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात “माझ्या कुटुंबाने माझ्या लग्नाची संपूर्ण तयारी आहे. अगदी माझ्या आईने लग्नाच्या दागिन्यांची खरेदी वगैरेही केली आहे. फक्त नवरदेव भेटणं तेवढ बाकी आहे. योग्य नवरा मुलगा मिळाला की मी लग्न करेन. हा योग्य केव्हा येईल, हे मात्र मला ठाऊक नाही. लग्नासाठी मुलगा कसा हवा, तर माझी एकच अट आहे. मला निर्व्यसनी मुलगा हवा. हीच माझी पहिली अपेक्षा आणि पहिली अट आहे,” असं प्राजक्ता म्हणाली होती. त्यामुळे ती लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
नुकतीच प्राजक्ता माळीने पटल तर घ्या या कार्यक्रमाला हजेरी लावली होती त्यातही तिला लग्नाबद्दल विचारण्यात आले होते. त्यावेळी ती म्हणाली होती की, “काहींना वाटतंय मी लग्न करावे, पण कोणीही असलं ना, तरी शेवटी आपण त्याला मराठीच बनवायचं”, असे म्हटल्याने प्राजक्ताला अमराठी मुलाशी लग्न करायचं असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण महत्वाचे म्हणजे ती लग्नासाठी तयार झाली आहे.