Latest Marathi News
Ganesh J GIF

माजी गृहमंत्र्याच्या भावाची स्वतः वर गोळी झाडत आत्महत्या

व्हाट्सअप स्टेटस ठेवत संपवलं जीवन, धक्कादायक कारण आले समोर

लातूर दि ५(प्रतिनिधी)- माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या लातुर येथील घरी त्यांचे चुलतभाऊ चंद्रशेखर पाटील चाकूरकर यांनी स्वतः वर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

चंद्रशेखर पाटील हे ८० वर्षांचे होते, ते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या लातुर येथील घराच्याजवळ राहत होते. दररोज वृत्तपत्र वाचण्यासाठी आणि सहज फेरफटका मारण्यासाठी चाकूरकर यांच्या घरी यायचे. तसे ते आजही आले होते.पण आज त्यांनी स्वतः सोबत आणलेल्या बंदुकीतून मधून डोक्यात गोळी झाडून घेतली. फायरचा आवाज झाल्यानंतर चाकूरकर यांचे चिरंजीव शैलेश पाटील हे हॉलमध्ये आले, तेव्हा चंद्रशेखर पाटील हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.त्यानंतर फॉरेंसिक टीमला देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. या टीमने देखील काही नमूने घेतले आहेत. या सर्व प्रक्रियेनंतर मृतदेह शवविछेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान वाढत्या वयासोबत त्यांना अनेक शारीरिक आजार देखील जडले होते. त्यामुळे कदाचित शारीरिक त्रासाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचललं असावं असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कारण त्यांनी स्वताच्या मोबाईलवरुन जवळच्या व्यक्तींना ‘गूड बाय’ असा मॅसेज केला होता. तर काही वेळाने व्हॉट्सअँपवर देखील त्यांनी ‘गूड बाय’ स्टेटस ठेवला होता. दरम्यान ही घटना घडली तेंव्हा माजी गृहमंत्री चाकूरकर हे दिल्ली येथे असल्याचे सांगण्यात आले आहे.

चंद्रशेखर पाटील यांनी इतकं टोकाचं पाऊल नेमकं का उचललं याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण ते गेल्या बऱ्याच दिवसापासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते. चंद्रशेखर चाकूरकर यांची बायपास झालेली होती. अशातच अनेक व्याधी जडल्या होत्या. ते सध्या एका मुलाबरोबर शिवराज चाकूरकर यांच्या घराच्या बाजूला असलेल्या फ्लॅटमध्ये राहत होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!