Latest Marathi News
Ganesh J GIF

बाई की पुरुष न कळणारे, दाढी मिशा नसणारे, हिजडेही आमदार होतात

शिंदे गटातील आमदाराची भाजप समर्थक आमदारावर शेलक्या भाषेत टिका, संघर्षात वाढ होणार?

जळगाव दि १८(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील दोन अपक्ष आमदारांमध्ये सध्या जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. अमरावती जिल्ह्यातील आमदार बच्चू कडू आणि दुसरे अपक्ष आमदार रवी राणा यांच्यात संघर्ष वाढला आहे. राणा आणि कडू दोघेही सत्ताधारी पक्षाला समर्थन देणारे आमदार आहेत. पण तरीही दोघांमध्ये वाद शि्गेला पोहोचला आहे. पण आता जळगाव येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कडू विरूद्ध राणा वाद तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. ज्याला मूच-दाढी नाही, असेही आमदार होतात…बाई की पुरुषही कळत नाही. हिजडेही आमदार होतात, असे बच्चू कडू म्हणाले आहेत. अर्थात त्यांनी कोणाचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख हा आमदार रवी राणा यांच्यावर होता. गेल्या काही दिवसांपासून अमरावतीचे राजकारण पेटले आहे. सुरुवातीला यशोमती ठाकूर आणि रवी राणा यांच्यात संघर्ष सुरु असताना त्यात रवी राणा यांनी यशोमती ठाकूर यांना लोकसभा निवडणुकीत पैसे दिले असतील तर दोघांची चौकशी व्हावी, त्याची तक्रार मी करणार असे म्हणत बच्चू कडू यांनी म्हणत उडी मारली होती. त्यावर बच्चू कडू हे मंत्रिपद मिळविण्यासाठी सरकारला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोपही आमदार रवी राणा यांनी केला होता. त्यावर कडू यांनी वादग्रस्त विधान केले होते. परंतु त्यानंतर पत्रकारांशी बोलताना बच्चू कडू यांनी भाषणात वापरलेल्या त्या शब्दाबद्दल माफी मागितली. आंडू ..पांडू लोकही आमदार होतात, असा माझा म्हणण्याचा उद्देश आहे, असे यावेळी आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान जळगावातील सावदा इथे काँग्रेसच्या रॅलीत एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत ही रॅली काढण्यात आली होती. या घटनेचाही बच्चू कडू यांनी कडक शब्दात समाचार घेतला. कॉलेज आणि शाळांमधील मुलांचा वापर पक्षाच्या कामासाठी होता कामा नये. एखादी संस्था असं करत असेल तर अशा संस्था बंद केल्या पाहिजेत, अशी मागणी कडू यांनी केली आहे. अलीकडे लोकप्रतिनिधींमधील वादात वाढ झाली आहे. आता रवी राणा यावर काय प्रतिक्रिया देतात की वादावर पडदा टाकतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दोन दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार व आमदार नितेश राणे यांनीही अशीच खालची भाषा वापरली होती. रोहित पवार यांना अजून दाढी मिशाच फुटलेले नाहीत असा टोला लगावला होता. त्यावर मला जिथे पाहिजे तिथे सगळीकडे केस आहेत, अशा भाषेत रोहित पवारांनी राणेंना उत्तर दिले होते. त्यावेळी याची जोरदार चर्चा रंगली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!