Latest Marathi News
Ganesh J GIF

उद्धव ठाकरे गटाची मशाल पेटण्याआधीच विझणार?

ठाकरेंच्या मशाल चिन्हावरून वाद, उद्धव ठाकरेंच्या अडचणी संपेनात

मुंबई दि १२(प्रतिनिधी) – निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह आणि नाव गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ‘मशाल’ चिन्ह देण्यात आले आहे, ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ या नावाला मंजुरी मिळाली. मात्र आता ठाकरे गटाला मिळालेल्या ‘मशाल’ या चिन्हावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. कारण मशाल या चिन्हावर दिवगंत जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पार्टीने दावा केला आहे. त्याचबरोबर ते अंधेरीत आपला उमेदवार उभा करणार आहे. त्यामुळे ठाकरेंसमोरच्या अडचणी वाढणार आहेत.

समता पार्टीने १९६६ पासून दावा मशाल चिन्ह आपले असल्याचा दावा केला आहे. तसेच आपण २०१४ पर्यंत याच चिन्हावर निवडणूका लढवल्या आहेत.त्यामुळे मशाल चिन्ह आपल्याकडे रहावे यासाठी त्यांनी आता निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. त्याचबरोबर दुसरीकडे अंधेरीपूर्व निवडणूकीत आपला उमेदवार देण्याची घोषणाही समता पार्टीने केलेला आहे. याप्रकरणी समता पक्षाने निवडणूक आयोगाला इ-मेल पाठवून आपण मशाल चिन्हावर दावा केला आहे. तत्पूर्वी सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने काढलेल्या आदेशात २००४ मध्ये समता पार्टीची राज्य पक्ष म्हणून मान्यता काढून घेत असल्याचे सांगत ठाकरे यांना धगधगती मशाल हे चिन्ह दिले आहे. पण समता पक्षाच्या दाव्यामुळे नवा पेच निर्माण झाला आहे. पण ठाकरेंना दिलासा म्हणजे अंधेरी पोटनिवडणुक झाल्यानंतर समता पक्ष निवडणूक आयोगाकडे जाणार आहे. ठाकरेंची मशाल आणि समता पक्षाची मशाल थोडीशी वेगळी दिसत असली तरी ईव्हीएम मशीनवर चिन्ह सारखेच दिसत आहे.

 

शिवसेनेला मशाल चिन्ह भेटल्यानंतर राज्यात शिवसैनिकांनी जल्लोषात स्वागत केले होते. अंधेरी पोटनिवडणूकीत ठाकरे गट नव्या चिन्हाने निवडणुकीला सामोरे जाणार आहे. पण समता पक्षाच्या नव्या दाव्याने ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे ठाकरेंची मशाल पेटण्याआधीच विझणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!