Latest Marathi News
Ganesh J GIF

बसचालकाच्या चुकीमुळे पालघरमध्ये चिमुकला जीवाला मुकला

अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद, व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल

पालघर दि १३(प्रतिनिधी)- एसटी बसच्या धडकेने संरक्षक भिंत अंगावर पडून एका चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जव्हार बस डेपोमंध्ये घडली आहे. मन हेलावून टाकणारी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या अपघातात एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

डहाणू- जव्हार ही बस जव्हार डेपोत रिव्हर्स घेताना बसची भिंतीला धडक लागली. या दुर्घटनेत ११ वर्षीय ओवीस मडकिया या लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर पंधरा वर्षीय सिंनाल हा मुलगा गंभीर जखमी झाला. जखमी सिंनाल याच्यावर येथील जव्हार कुटीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जव्हार डेपोतील ही घटना आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. अपघातातील दोन्ही मुले एकाच कुटुंबातील असून ते मुळचे राजकोट येथील आहेत. एसटी बस चालकाच्या चुकीमुळे या दुर्घटने एका लहान मुलाचा नाहक मृत्यू झाला.

दोन मुले पालकासमवेत आपल्या नातेवाईकाकडे येत होते. पालक बसमधून उतरून आपल्या दोन्ही मुलांना संरक्षण भिंतीच्या बाजूला उभे करून त्यांचे पालक रिक्षा आणण्यासाठी मुख्य रस्त्या वर गेले असताना हा अपघात घडला आहे. या घटनेबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत. सुरू आहेत. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!