Latest Marathi News
Ganesh J GIF

पास होऊनही दोन विद्यार्थिनींनी संपवले जीवन

चेतनाने पहिल्या श्रेणीत पास होऊनही का घेतला टोकाचा निर्णय, अंत्यसंस्कारावेळी गोंधळ

पुणे दि ४(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीच्या परीक्षेच्या निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या परिक्षेत मुलींनी बाजी मारली असून अनेक ठिकाणी मुलींच अग्रेसर दिसून आल्या आहेत. पण नागपूरमध्ये पास होऊनही एका विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

नागपूरातील सक्करदरा परिसरात चेतना भोजराज भोयर हिला ७१ टक्के गुण मिळूनही अपेक्षित गुण न मिळाल्याच्या कारणावरून तिने आपले जीवन संपवले. प्रथम श्रेणीत येऊनही कमी गुण मिळाल्याचा समज तिने करून घेतला. त्यामुळे ती तणावात होती. दुपारी चेतनाने खोलीतील पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला.  त्यानंतर चेतनाला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेने शोकाकुल वातावरण पहायला मिळाले असून या प्रकरणी आता पुढील तपास सुरु आहे. दरम्यान अंत्यसंस्कारासाठी चेतनाचे पार्थिव दिघोरी घाट येथे आणण्यात आले. आत्महत्या केलेल्या मुलीचे शवविच्छेदन न करताच तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येत असल्याची माहिती सक्करदरा पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक तेथे गेले. नातेवाइकांची समजूत घातली. त्यानंतर मेडिकलमध्ये शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर नातेवाइकांनी चेतनाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नागपूरातील वाडी परिसरातील रामदुलारी पंचम झारीया या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत नापास झाल्याने गळफास लावून केली आपलं जीवन संपवले. निकाल लागून काही दिवस होताच दोन विद्यार्थिनींनी नैराश्यातून आयुष्य संपवलं आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!