Just another WordPress site

दोन महिलांची टोलनाक्यावर एकमेकींच्या झिंज्या धरत हाणामारी

महिलांच्या हाणामारीचा 'तो' व्हिडिओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल

नाशिक दि १५ (प्रतिनिधी)- नाशिक मधील पिंपळगाव बसवंत टोल नाका पुन्हा एकदा नव्या वादामुळे चर्चेत आला आहे. नेहमीच हा टोलनाका वादाच्या भोवऱ्यात असतो. आज हा टोलनाका दोन महिलांमधील वादामुळे चर्चेत आला आहे. टोल भरण्याच्या वादातून, प्रवासी आणि टोल कर्मचारी महिला यांच्यात तुंबळ हाणामारी झाली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

निफाड तालुक्यातील सीआरपीएफ जवान आणि त्यांची पत्नी आपल्या दोन मुलांसोबत पुण्याला जात होते. घटनेच्या दिवशी संध्याकाळी पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर स्वत:चे शासकीय कार्ड दाखवून खासगी वाहन सोडण्याची विनंती केली. त्यावर टोलनाक्यावरील महिला कर्मचाऱ्यांनी तुम्हाला टोल भरवाच लागेल, कार्ड चालणार नाही, असं सांगितले. यावरून सीआरपीएफ जवानाची पत्नी आणि टोल कर्मचारी महीलेमध्ये बाचाबाची झाली,पण थोड्याच वेळात त्याच रूपांतर थेट हाणामारीत झाले. काही वेळाने पोलीस आल्यानंतर वादावर पडदा टाकण्यात आला. दोन्ही बाजूकडून पोलिसांनी माफीनामे लिहून घेत या प्रकरणावर पडदा टाकला.याचा व्हीडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

GIF Advt

या टोलनाक्यावर काही दिवसांपूर्वी थेट नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचीच गाडी टोल कर्मचाऱ्यांनी अडवली होती. सचिन पाटील आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला होता. तेव्हा सबंधित पिंपळगाव पोलीस ठाण्यात टोलनाका कर्मचार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.अशी अनेक प्रकरणे या टोलनाक्यावर घडली आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!