Just another WordPress site

‘सकाळी ६ वाजेपर्यंत काम करतात तर मग झोपतात कधी?’

अजित पवारांची शिंदे-फडणवीस सरकारच्या कारभारावर टोलेबाजी बघाच

जळगाव दि १५ (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात कितीतरी चुकीच्या घटना घडत आहेत. पण मुख्यमंत्री विषय तिसरीकडेच घेऊन जात आहेत. जेव्हा पाहा तेव्हा ते सांगतात की मी ६ वाजेपर्यंत काम करतो. मी म्हटलं सकाळी ६ वाजेपर्यंत काम करतो तर हा माणूस उठतो कधी? आणि झोपतो कधी? असा टोला अजितदादांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. त्यामुळे एकच हशा पिकला होता. जळगावमध्ये अजित पवारांनी शिंदे सरकारवर जोरदार टिका केली आहे.

अजित पवार यांनी आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांच्या कारभाराचा समाचार घेतला ते म्हणाले “आम्ही सरकारमध्ये असताना कॉंग्रेसच्या नेत्यांचं काही चुकलं तर सोनिया गांधींचा फोन आल्यावर लगेच ती चूक दुरूस्त व्हायची. राष्ट्रवादीच्या नेत्यांचं चुकलं तर पवार साहेबांचा फोन यायचा, त्याचबरोबर शिवसेनेचं चुकलं तर उद्धव साहेबांचा फोन आल्यानंतर ती चूक दुरूस्त व्हायची. आता या दोघांच्या काळात कुणी कुणाचं ऐकायलाच तयार नाही. ते ४० आमदात म्हणतात आम्ही सर्वच मुख्यमंत्री आहोत, अरे सर्वच मुख्यमंत्री म्हणजे अधिकाऱ्यांनी ऐकायचं कुणाचं? अधिकाऱ्यांना तर दमच देतात तुझी बदली करू, अधिकारी काय तुमचे घरगडी वाटले का? राज्यात शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालल्या आहे. सरकारला शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाही. आतापर्यंत एकाही शेतकऱ्याला मदत मिळाली नाही. जेव्हा पाहतो तेव्हा मुख्यमंत्री म्हणतात की मी सकाळी ६ वाजेपर्यंत काम करतो, ते ६ वाजेपर्यंत काम करतात तर मग झोपतात कधी?’ असा सवाल विचारात कारभारावर नाराजी व्यक्त केली.

GIF Advt

वेदान्त प्रकल्पावरूनही अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे यांनी पुन्हा हा प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करावे. हा प्रकल्प राज्यातून जात असेल, तर गाजर दाखवण्याचं काम केलं जात आहे. ज्यामाध्यमातून राज्याला रोजगार, गुंतवणूक, देशाला आणि राज्याला जीएसटी मिळेल, असे प्रकल्प आले पाहिजे. हे प्रकल्प येताना विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी राजकारण करू नये असे म्हणत शिंदेना प्रकल्प परत आणण्यासाठी ठाम भूमिका घेण्याची विनंती केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!