उद्धव ठाकरेंचे ‘तो’ प्रश्न आणि अरविंद सावंतांनी खुर्ची सोडली
मातोश्रीवरील पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात अरविंद सावंताचीच होतेय चर्चा
मुंबई दि २९ (प्रतिनिधी) – राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत बिकट अवस्था झाली होती. पण आता नवे सहकारी सोबत घेत उद्धव ठाकरे यांनी पक्षाची बांधणी सुरू केली आहे. पण यावेळी ठाकरेंचा आदेश येताच अरविंद सावंत यांनी खुर्ची सोडल्याचा फोटो व्हायरल झाला आहे.
शिवसेनेने संभाजी बिग्रेडसोबत युतीची घोषणा केल्यानंतर आज बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेतील काही लोकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी भाजपासह शिंदे गटाला निशाणा साधला. या पत्रकार परिषदेत कळमनुरीचे माजी आमदार संतोष टरफे, शेतकरी नेते अजित मगर यांच्यासह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशावेळी मातोश्रीवर मोठी गर्दी होती. पत्रकार परिषदेत बजरंग दलचे नेते उपस्थित होते. तेव्हा उद्धव ठाकरेंनी शेजारील बसलेल्या अरविंद सावंत यांना त्यांना तुम्ही कुठे बसवणार? असा सवाल केला. तेव्हा सावंतांनी मी उठतो असं म्हणत खुर्चीवरून उठून बाजूला गेले हे दृश्य माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाले. त्यामुळे सावंतांची मोठी चर्चा सुरु झाली. कारण एकनाथ शिंदे गटाने मंत्रीपदाच्या आशेने पक्ष सोडल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जातो. पण अरविंद सावंत यांनी महाविकास आघाडी तयार होत असताना एनडीएच्या कोट्यातून शिवसेनेला मिळालेले मंत्रिपद उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर सोडले होते. आणि आता पुन्हा एकदा स्वतः उभे राहत त्यांनी प्रवेश केलेल्या नेत्यांना बसायला जागा दिली.
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार. शिवसेना, शिवसैनिक ठाम आहे. शिवसेना रस्त्यावर पडलेली वस्तू नाही कुणीही उचलली आणि खिशात टाकावी. अस म्हणत एकनाथ शिंदेंवर टिका केली होती. पण अरविंद सावंत यांच्यातील सच्चा शिवसैनिकाचीच जास्त चर्चा रंगली होती.