
कृषीमंत्री माणिकराव कोकटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल
विरोधक आक्रमक, दादाचा नेता पुन्हा अडचणीत, चर्चेऎवजी विधिमंडळात कोकाटेंचे जंगली रमी पे आओ ना महाराज...
मुंबई – राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधीमंडळामध्ये गेम खेळतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे आधीच वादग्रस्त विधानामुळे अडचणीत आलेले कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काकाटे यांचे व्हिडीओ एक्स पोस्ट केले असून ते रमी खेळत असल्याचा दावा केला आहे. सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा – कर्जमाफी – भावांतरची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का? असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईलमध्ये गेम खेळत आहे. ऑनलाईन पत्त्यांची गेम खेळत असलेले माणिकराव कोकाटे हे टेबलाखाली गेम खेळत असल्याचे दिसून येत आहे. सदर व्हिडिओ हा विधान परिषदेमधील असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या व्हिडिओमुळे राज्याच्या राजकारणामध्ये उलथापालथ होण्याची शक्यता आहे. दरम्यान संजय राऊत यांनी कोकाटे यांच मंत्रिपद जाणार असल्याचा मोठा दावा केला आहे. तसेच अमित शाह यांनी राज्यातील सहा ते सात जणांना मंत्रिपदापासून वगळण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांना केला असल्याचे देखील राऊत म्हणाले आहेत.
https://x.com/RRPSpeaks/status/1946778150857580930?t=I7DSWG5aTRC5d2PDQ1Sg2Q&s=19
आता या प्रकरणी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी कोणाला तरी दाखवत असेल अशा प्रकारची रमीची जाहिरात येत म्हणून, अशी प्रतिक्रिया कोकाटेंनी दिली आहे. यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून कोकाटे अडचणीत आलेत.