Latest Marathi News
Ganesh J GIF

ना ठाकरे ना शिंदे खरी शिवसेना वाडकरांची

बाळासाहेबांनीच शिवसेना तुझी असल्याचे सांगितल्याचा दावा, बघा वाडकरांची शिवसेना

डोंबिवली दि २२(प्रतिनिधी)- शिवसेना कोणाची यावर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा वाद न्यायालयात पोहोचलेला आहे. अशावेळी शिवसेना मात्र वाडकरांची झाली आहे. कारण बाळासाहेबांवर निष्ठा असणाऱ्या एका शिवसैनिकाने आपल्या मुलीचे नावच चक्क शिवसेना ठेवले आहे.याची जोरदार चर्चा होत आहे.

पांडुरंग वाडकर हे डोंबिवलीत आपल्या कुटुंबासोबत राहतात. ते मूळचे महाडमधील कीयेचे रहिवाशी आहेत. लहानपणापासून पांडुरंग हे शिवसैनिक राहिलेले आहेत.
पांडुरंग वाडकर यांना गेल्या १७ ऑक्टोंबर मुलगी झाली. त्यांनी तिचे नाव शिवसेना ठेवले आहे. तशी नोंद देखील त्यांनी ग्रामपंचायत मध्ये केली आहे. मुलीचे नाव शिवसेना ठेवण्यावर वाडकर म्हणाले की, बाळासाहेब माझ्या स्वप्नात आले आणि म्हणाले की, घाबरु नकोस, तुझ्या घरात शिवसेना आहे. वाडकर यांना स्वप्नात झालेला दृष्टांत पाहून त्यांनी मुलीचे नाव शिवसेना ठेवले आहे. त्यांच्या शिवसेना प्रेमाची सगळीकडे एकच चर्चा होत आहे.


माझं नाव शिवसेना. या आशयाच्या प्रचाराची क्लिप काही वर्षापासून शिवसेनेकडून निवडणुकीत वापरली जाते. पण आता खरच वाडकर यांनी मुलीचे नाव शिवसेना ठेवल्यामुळे खरी शिवसेना कोणाचीही ठरो पण सगळ्याआधी ती वाडकरांची झाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!