
‘आमच्यात शिवसेनेचे स्पिरीट अजूनही कायम आहे क्रांती घडवू’
कोर्टात जाताना संजय राऊत शिंदे गटावर बरसले, नेहमीच्या शैलीत म्हणाले...
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगात असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत प्रतिक्रिया देत शिंदे गटाला डिवचल आहे. राऊत यांना सुनावणीसाठी न्यायालयात घेऊन जात असताना न्यायालयात शिरण्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे चिन्ह धनुष्य बाण आणि नाव गोठवले आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत.पण शिवसेनेची तोफ म्हणून ओळखले जाणारे राऊत नसल्यामुळे शिवसेनेकडे आक्रमक आवाज नव्हता पण आज राऊत यांनी संवाद साधत प्रतिक्रिया दिली ते म्हणाले “शिवसेनेचे नवे चिन्ह कदाचित क्रांती घडवून आणेल. यापूर्वी देशात ज्या पक्षांची चिन्ह गोठवण्यात आली, ते पक्ष पुढे जाऊन मोठे झाले. आम्हीदेखील तसेच मोठे होऊ. आमच्यात असलेलं शिवसेनेचे स्पिरीट अजूनही कायम आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याने आम्हाला कोणातही फरक पडत नाही. आम्ही नव्या जोमाने काम करु. आम्ही पक्षाचे नवे चिन्ह आणि पक्षाचे नवीन नाव लोकांपर्यंत पोहोचवू असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. दरम्यान संजय राऊत यांच्या कोठडीत आज १७ ऑक्टोबर पर्यंत वाढ करण्यात आली आगे. त्यामुळे त्यांच्या जेलमधील मुक्काम वाढला आहे.
संजय राऊत शिवसेनेचा अजेंडा ठामपणे मांडण्याबरोबर शिंदे गट, भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेत होते. त्यामुळे शिवसैनिक कायम आक्रमक असायचा. पण संजय राऊत तुरुंगात गेल्यानंतर शिवसेनेकडे राऊतांसारखा प्रभावी प्रवक्ता नाही. ती उणीव शिवसेनेला जाणवत आहे.मात्र, आता संजय राऊत यांची दिलेली प्रतिक्रिया शिवसैनिक किती अपील करणार हे पहावे लागेल.