Latest Marathi News
Ganesh J GIF

‘अडीच वर्ष आम्ही सरकार आणण्यासाठी प्लॅनिंग करत होतो’

भाजपाच्या या नेत्याचा मोठा गाैप्यस्फोट, एकनाथ शिंदें तोंडघशी?

पुणे दि ७(प्रतिनिधी)- “दोन अडीच वर्षे मी म्हणत होतो की, आपलं सरकार येणार, मी काही वेडा नव्हतो, मला माहिती होत की आपलं सरकार येणार.अडीच वर्ष आम्ही सरकार आणण्यासाठी प्लॅनिंग करत होतो. अडीच वर्षे लागले पण सरकार आणले, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे शिंदेच्या बंडावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार अस असताना चंद्रकांत पाटील सतत सरकार कोसळण्याच्या नवनव्या तारखा जाहीर करायचे त्यावेळी त्यांची सतत खिल्ली उडवली जायची. पण आता त्यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, “मी दोन-अडीच वर्षांपासून सांगत होतो की आपलं सरकार येईल, मी हे सांगायला काही वेडा नव्हतो. काही ना काही संदर्भ माझ्या मनात होते. त्याची योजना माझ्या मनात होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला कार्यकर्त्यांना विश्वास द्यायचा होता. ४० जणांना फोडणं सोपं नव्हतं. त्यासाठी वेळ लागणार होता. त्यासोबत तशी संधी येणं महत्त्वाचं असतं. योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती वेळ साधली. त्यानंतर आपलं सरकार आलं. असा मोठा गाैप्यस्फोट पाटील यांनी केला आहे. त्यामुळे शिंदेच्या बंडामागची मुख्य सूत्रधार भाजपा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्ववादी विचारांचे कारण देत शिवसेना सोडल्याचा दावा वारंवार केला आहे. आम्हाला राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर सत्ता नको असेही कारण त्यांनी दिले तसेच आम्ही बंड नाही उठाव केल्याचेही त्यांनी सांगितले. पण पाटलांच्या वक्तव्यामुळे शिंदे गटाच्या पाठीमागची मोठी शक्ती भाजपाचीच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!