
दिल्ली दि २३(प्रतिनिधी)- शिवसेना कोणाची याबरोबरच राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या नाट्यात शिंदे गटातील १६ आमदार या सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे
आवाज कुणाचा याचा फैसला आज होणार आहे.
आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे शिंदे सरकारचं भवितव्य आजच्या सुनावणीवर अवलंबून असणार आहे. शिवसेना आमचीच आहे असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. या कायदेशीर लढाईत शेवटची सुनावणी ४ ऑगस्टला झाली होती. त्यानंतर तिसऱ्यांदा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. आधी १२ ऑगस्ट, त्यानंतर २२ आणि आता २३ ऑगस्टला ही सुनावणी होणार आहे. त्रिसदस्यीय खंडपीठातील एक न्यायाधीश सोमवारी उपलब्ध नसल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिवसेना पक्षावर दावा सांगितला आहे. उद्धव ठाकरे तसेच शिंदेसेनेकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे यासंबंधीचे पुरावेही दाखल करण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे गटासंबंधीच्या याचिकांवरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी झाल्याशिवाय केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये, अशी मागणी शिवसेनेने केली होती.ती मान्य करण्यात आली होती सरन्यायाधीश रमण्णा २६ आॅगस्टला निवृत्त होणार असल्याने आजच्या सुनावणीकडे लक्ष असणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंड करण्याबरोबरच शिवसेना पक्षावर दावा केला आहे. त्याचबरोबर शिवसेनेने पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे १६ आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली होती. त्यामुळे राज्याच्या राजकारणातील मोठी सुनावणी आज पार पडणार आहे यात काय निर्णय होणार याकडे अनेकांच्या नजरा असणार आहेत.