अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने काढला काटा
दृश्यम चित्रपटाप्रमाणे लावली मृतदेहाची विल्हेवाट, पत्नी आणि प्रियकर अटकेत
नोएडा दि १६(प्रतिनिधी)- पती अनैतिक संबंधात अडसर ठरला म्हणून पत्नीने प्रियकराच्या मदतीने ‘दृश्यम’ चित्रपटातील स्टोईलने पतिची हत्या केल्याचे समोर आले आहे. ग्रेटर नोएडामध्ये ही घटना घडली आहे.. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
ग्रेटर नोएडा येथे बुलंदर शहरातील सतीश पाल हा युवक पत्नी नितू आणि मुलासोबत राहत होता. सतीश नोएडा येथील एका कंपनीत काम करत होता. त्यावेळी पत्नी नितूचे त्यांच्या घराशेजारी काम करणा-या मिस्त्रीसोबत सुत जुळले.पण याची माहिती पती सतीशला समजली त्यावेळी त्याने याला विरोध करत पत्नीला मारहाण केली. त्यांनतर अनैतिक संबधात अडसर ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्याचा कट नितुने रचला. तिने २ जानेवारीला सतीश कंपनीत ड्युटी करून रात्री उशिरा घरी परतल्यानंतर दारूमध्ये नशेच्या गोळ्या मिसळत ती दारु पतीला पिण्यासाठी दिली. नंतर तिने प्रियकर हरपाल आणि त्याच्या साथीदाराला घरी बोलावले. त्यांनी सतीश पालची गळा आवळून हत्या केली. तर त्याचा मृतदेह शेजारच्या काम सुरू असलेल्या घराच्या सेप्टिक टँकमध्ये पुरत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. नातेवाईकांचा त्याच्याशी संपर्क न झाल्याने पालच्या भावाने बिसरख पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
पत्नी नीतुला याची माहिती समजताच ती हरपालसोबत पळून गेली. त्यामुळे पोलिसांन तिच्यावर संशय आला. अखेर त्यांनी प्रियकर हरपालला ताब्यात घेऊन चाैकशी केल्यानंतर खुनाचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सध्या गवंडीला अटक करण्यात आली असून आरोपी पत्नी नीतूलाही अटक करण्यात येणार आहे.