Latest Marathi News
Ganesh J GIF

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची नियुक्ती?, बघा सभागृहात काय घडल

मुंबई दि १३ (प्रतिनिधी)- विधानपरिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते म्हणून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची नियुक्ती केली आहे. तर प्रतोदपदी आमदार अनिकेत तटकरे यांची नियुक्ती केली आहे. मात्र, यामध्ये विधीमंडळाकडून मोठी चूक करण्यात आली आहे.

विधिमंडळाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात मात्र एकनाथ खडसे यांच्याएैवजी एकनाथ शिंदे असा उल्लेख झाल्याने मोठा गोंधळ उडाला. त्याच बरोबर शिंदे राष्ट्रवादीत जाणार का अशी गमतीशीर चर्चा रंगली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत याबाबत माहिती दिली.राष्ट्रवादीने विधानपरिषदेच्या गटनेतेपदी एकनाथ खडसे यांची नेमणूक करावी, असे पत्र विधान परिषदेच्या उपसभापतींना पाठवले होते. मात्र, विधान परिषदेकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकांमध्ये खडसे यांच्या ऐवजी एकनाथ शिंदेंच नाव आढळून आल्याने जयंत पाटलांनी विधानसभेत सरकारला धारेवर कोंडीत पकडले. पाटील यांनी शिंदेना जोरदार टोले लगावले ते म्हणाले “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल तर देशाचे पंतप्रधानच बदले आहेत. मुर्मू मॅडम देशाच्या पंतप्रधान आहेत, असे म्हटले होते,एकनाथ शिंदे यांची आता राष्ट्रवादीच्याही विधीमंडळ गटनेते पदावर नेमणूक व्हावी, अशी इच्छा दिसते आहे,माझ्याकडे राष्ट्रवादीचे विधानसभेतील गटनेते पद आहे, तेही पद आता धोक्यात आले आहे. असे वाटायला लागले आहे, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. त्याचबरोबर नागालँडचा उल्लेख करत शिंदेवर टिका केली. यावेळी एकनाथ शिंदे यांची नियुक्ती करण्यात येत. हे पत्र जयंत पाटील यांनी विधानसभेत वाचून दाखवले त्यामुळे सभागृहात जोरदार हशा पिकला होता.

जयंत पाटील यांनी दिलेली माहिती विधानपरिषदेच्या कामाकाजाची दिसत आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या कामकाजाबद्दल विधानसभेच्या सभागृहात चर्चा करता येणार नाही. पण, विधिमंडळाचा उल्लेख केला असल्याने याविषयी सखोल माहिती घेऊन योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन राहुल नार्वेकर यांनी यावेळी दिले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!